कोरोनानंतर आता महावितरणचा मार, समायोजित रकमेच्या नावाखाली ग्राहकांची लूट  

जलील पठाण
Tuesday, 27 October 2020

समायोजित रकमेच्या नावाखाली सहाशे रुपयांची लूट 

औसा (लातूर) : कोरोनामुळे शटर बंद केल्याने अनेक उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. अनेक व्यापाऱ्यांना दुकानभाडेही देणे मुश्कील झाले आहे. असे असताना लॉकडाउन काळात थांबवलेली समायोजित रक्कम आता महावितरण वसूल करीत आहे. यामुळे प्रत्येक व्यापारी दुकानदाराला महिन्याला साडेपाच ते सहाशे रुपयांचा भुर्दंड भरावा लागत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताळेबंदीच्या काळात थांबवलेली ही रक्कम आता हप्त्या-हप्त्याने वसूल केली जात असल्याने आधीच टाळेबंदी आणि कोरोनाने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आता महावितरण त्रस्त करीत असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर अनेक बिलावर चुकीचे मीटर क्रमांक आल्याने एकाचे मीटरबील दुसऱ्याच्या नावावर जात असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले. सहा सात महिने दुकानाचे शटरही व्यापाऱ्यांना उघडता आले नाही. सर्व बाजूंनी या संकट काळात उपाययोजना केल्या जात असल्याने महावितरणने दर महिन्याला वीज ग्राहकांच्या बिलात समायोजित रक्कमेची वसुली थांबवली. व्यापाऱ्यांच्या संकटात महावितरणही खारीचा वाटा उचलत असल्याचे समाधान ग्राहकांत पाहायला मिळाले. खरे तर या काळात दुकाने सुरू नव्हती, विजेचा वापरही शून्य होता. या काळातील फक्त मीटर भाडे आकारणे अपेक्षित असताना बंद काळातही भरमसाट वीजबिले देण्यात आली. आणि थांबवलेली समायोजित रक्कमेची वसुली महावितरणने दोन महिन्यांपासून पुन्हा सुरू केली. अनेकांनी बिले पाहिल्यावर धसका घेतला आणि बारकाईने बिले तपासली असता अनेकांना समायोजित रकमेच्या नावाखाली सहाशे रुपये आगाऊ रक्कम समाविष्ट झाल्याचे आढळून आले. तर बऱ्याच ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता सरासरी बिले देण्यात आली. शहरातील अनेक वीज ग्राहक सध्या बिले दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एकाचे मीटर दुसऱ्याच्या नावावर 
अनेक ग्राहकांना जे मीटर बसविले आहे. त्याचा क्रमांक त्यांच्या बिलावर येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्या ग्राहकाचे बिल पाचशे-सहाशे यायला पाहिजे त्याच्या नावावर दोन अडीच हजार बिल येत असल्याने आता ग्राहक संतप्त झाले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

समायोजित रक्कम थकीत असल्याने ती टप्याटप्याने घेतली जात आहे. चुकीच्या मीटर क्रमांकामुळे ज्याला जास्त बिले अली आहेत अशा ग्राहकांना बिल कमी करून दिले जात आहे. सर्व ग्राहकांचे मीटर क्रमांक दुरुस्तीची प्रक्रियाही सुरू आहे. 
- प्रमोद दुधाळे, अभियंता उप कार्यालय, औसा 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL Robbery of customers in name of adjusted amount latur news