धक्कादायक : मध्यरात्री त्याने मागितला मोबाईल, याने दगड घालून डोकेच ठेचले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

वाळूज (जि. औरंगाबाद ) - अनोळखी व्यक्तीने एका युवकाला मोबाईल मागितला. त्याने तो दिला नाही. मोबाईल मागणाऱ्याने शिविगाळ केली. त्यामुळे मोबाईल न देणारा युवक संतप्त झाला. दोघांमध्ये झटापट झाली. रागाच्या भरात युवकाने मोबाईल मागणाऱ्याच्या डोक्‍यात दगड घातला. यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूर येथे शनिवारी (ता.सात) सकाळी उघडकीस आली. यातील संशयितास पोलिसांनी अटक केली. 

टाक पिंपळगाव (ता. वैजापूर) येथील सचिन मधुकर पवार (वय 22) हा नायगाव बकवालनगर येथे राहतो. तो शुक्रवारी रात्री पंढरपूर येथे आला होता. त्याला एका 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला; मात्र मोबाईल न दिल्याने अनोळखी व्यक्तीने सचिनला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये झटापट झाल्याने सचिनने जवळच पडलेला दगड उचलून अनोळखी व्यक्तीच्या डोक्‍यात घातला.

यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर सचिन त्याच्या मूळगावी फरार झाला. शनिवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाहून खुनाची ही घटना उघडकीस आली. 

बाप रे -  ऐकावे ते नवलच, औरंगाबादेत चक्‍क भिंतच हरवली 

अवघ्या काही तासांत संशयित अटकेत 
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, पोलिस उपनिरीक्षक प्रीती फड, श्वान पथकाचे ए. एस. हारणे, ए. टी. खाकरे यांच्यासह श्वान स्विटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हेही वाचा - व्हॉट्सअप स्टेटस पाहणे विनयभंग

यावेळी स्विटी या श्वानाने संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते वळदगाव कमानीजवळ जाऊन घुटमळले. पोलिसांनी तपास करून करून संशयितास टाक पिंपळगाव येथून सायंकाळी सहाच्या सुमारास अटक केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a Person At Waluj Aurangabad