murder of young man Aurangabad
murder of young man Aurangabad

औरंगाबाद : मारहाणीत तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद - घराला लाथ लागल्यावरून तिघांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी सव्वीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात सोमवारी (ता. 11) सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संतोष गुडे (वय 26, रा. संग्रामनगर, सातारा परिसर) असे मृताचे नाव आहे. संतोष सुया, फणी, कंगवे विक्री करून चरितार्थ चालवित होता. गत काही दिवसांपुर्वीच तो सातारा परिसरातील बेंबडे हॉस्पीटलमागे राहण्यास आला होता. तो राहत असलेल्या घराजवळ अनिल सिन्नाअप्पा फुलमाळे (वय 25, रा.संग्रामनगर, बीड बायपास) हा राहतो. 9 नोव्हेंबरला रात्री दीडच्या सुमारास संतोष लघुशंकेसाठी उठला. यावेळी तोल गेल्याने संतोषचा अनिल फुलमाळेच्या घराच्या धक्का बसला. त्यामुळे रागाच्या भरात अनिल फुलमाळेने व अन्य दोन महिलांनी संतोषला शिवीगाळ करून रॉडने मारहाण केली.

यात डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर सातारा पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. तपास सहाय्यक निरीक्षक कराळे करीत आहेत. 

बनावट कागदपत्रांद्वारे घेतले जामीन 
औरंगाबाद - बनावट कागदपत्र तयार करून आरोपींचे जामीन घेणाऱ्या टोळीत चक्क पोलिसाचाच मुलगा सहभागी असल्याची खळबळजनक प्राथमिक बाब समोर आली आहे. असा दावा पकडलेल्या संशयिताने केला आहे. त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी (ता. 11) अटक केली. त्याच्या घरातून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, ऐपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) पोलिसांनी जप्त केले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख जहॉंगीर शेख आलमगीर (28, रा. नेहरूनगर, पाकिजा दूध डेअरीजवळ, कटकटगेट) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. यापूर्वी एकूण अकरा संशयितांना याच प्रकरणात 7 नोव्हेंबरला अटक झाली होती. त्यांना न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान मुख्य संशयित शेख मुश्‍ताक याच्या चौकशीतून शेख जहॉंगीरचे नाव समोर आले.

पोलिसांनी ओळख पटवून सोमवारी त्याला अटक केली. त्याने औरंगाबादेतील न्यायालयात तीन वेळा व एकवेळ पुणे येथे एकवेळा बनावट कागदपत्राद्वारे आरोपींचा जामीन घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले वडील पोलिस खात्यात आहेत असे सांगितले. आम्ही याबाबत खात्री करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या टोळीत आणखी काहीजण असून ही संख्या पंधरापेक्षा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com