नागनाथाची पिंड पांढऱ्या वस्‍त्रामध्ये झाकली

Nagnath Pind
Nagnath Pind

औंढा नागनाथ(जि. हिंगोली) : येथे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाचे मंदिर अद्यापही बंदच आहे. रविवारी (ता.२१) सूर्यग्रहाणामुळे पांढऱ्या वस्‍त्रामध्ये नागनाथाची पिंड झाकून ठेवण्यात आली. तसेच या कलावधीत पिंडीवर जलाभिषेकदेखील सुरू होता.

औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. रविवारी सूर्यग्रहण असल्यामुळे नागनाथ देवाची पिंड पांढरे शुभ्र वस्‍त्रात झाकून ठेवण्यात आली होती. 

देवाच्या पिंडीला ओले ठेवणे शास्त्रीय कारण 

तसेच पिंडीवर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सतत जलाभिषेकदेखील सुरू होता. मंदिरात ‘ओम नमः शिवाय’ असा जप या कलावधीत सुरू होता. सूर्यग्रहणामध्ये देवाच्या पिंडीला ओले ठेवणे शास्त्रीय कारण असल्याचे मुख्य पुजारी हरिहर भोपी यांनी सांगितले.

तीन महिन्यांपासून नागनाथाचे मंदिर बंद

 तीन महिन्यांपासून नागनाथाचे मंदिर बंद आहे. मात्र, येथे दररोज नित्‍यनेम होणारे कार्यक्रम सुरूच आहेत. मंदिरात दररोज पहाटे साडेपाच वाजता, दुपारी बारा वाजता, सायंकाळी चार वाजता नागनाथाला स्नान घालण्यात येते. रात्री साडेआठ वाजता शेजारती केली जाते. 

हरिहर तलावात अनेकांनी स्‍नान केले

सूर्यग्रहण काळात येथे असलेल्या हरिहर तलावात स्‍नान करण्याची परंपरा असल्याने रविवारीदेखील ग्रहण संपल्यावर हरिहर तलावात अनेकांनी स्‍नान केले. तसेच बाहेरून कलश दर्शनही घेतले. ग्रहणाचा कालावधी संपल्यावर तीन वाजता पूजा, आरती महानैवद्य नागनाथला देण्यात आला.

जप करण्यास कोणत्याही अडचणी नाहीत

 नागनाथ मंदिरात अनेक वर्षांची ग्रहण काळात असलेली परंपरा आजही त्याच पद्धतीने करण्यात आली. एरव्ही मंदिरात भाविकांची गर्दी असते. मात्र, ग्रहण काळात संपूर्ण धार्मिक कार्यक्रम जप करण्यास कोणत्याही अडचणी आल्या नसल्याचे श्री. भोपी यांनी सांगितले.

शासनाचे आदेश येईपर्यत मंदिर बंद 

 हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंदच आहे. परंतु, मंदिरात सकाळ, सायंकाळी स्‍वच्‍छता केली जात आहे. भावीकांना दर्शनासाठी हे मंदिर शासनाचे आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याचे श्री. भोपी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com