माहेरचा झोका, यंदा सासरी झुलला... 

टेंभुर्णी : कोरोनामुळे सासरीच झोक्याचा आनंद घेताना महिला.  
टेंभुर्णी : कोरोनामुळे सासरीच झोक्याचा आनंद घेताना महिला.  

टेंभुर्णी (जि.जालना) -  मनस्वी आनंद देणाऱ्या श्रावणमासातील सण-उत्सवाला प्रारंभ झाला; मात्र यावर्षी कोरोनामुळे माहेरवाशिणींना सासर सोडता आले नाही. यामुळे माहेरची ओढ लागलेल्या महिलांना यंदा नागपंचमीचा उत्सव सासरीच साजरा करावा लागला. माहेरचा झोका यंदा सासरीच झुलावा लागला.

कोरोनामुळे हे वर्ष जुन्यापेक्षा अलग बनले. एसटी बंद, ठिकठिकाणी जिल्हा प्रवेशबंदी, ऑनलाइन परवानगी, शिवाय लेकराबाळांसह प्रवासादरम्यान विषाणूच्या संसर्गाची सतत वाटणारी भीती अशा वातावरणात इच्छा असूनही अनेकींना माहेरी जाता आलेले नाही.

माहेरची ओढ लागलेल्या अशा लेकींना यावर्षी सासरीच नागपंचमी साजरी करावी लागली. यामुळे अनेकींनी माहेरी झुलायचा झुला यंदा सासरीच झुलला. यंदा कोरोनामुळे अनेक मुलींची लग्न मोजक्या उपस्थितीत; तसेच साधेपणामुळे झाले. या नवविवाहित मुलींचा यंदाचा नागपंचमीचा पहिला सण. त्यांना दिवसभर आठवणींच्या हिंदोळ्यावर माहेर खुणावत राहिले.

दरम्यान, नागपंचमीच्या निमित्ताने गावातून निघणाऱ्या नागपाट्याही यावर्षी निघाल्या नाहीत. वारुळावरही फारशी गर्दी नव्हती. घरातच भिंतीवर नागोबाची चित्र काढून अनेकांनी पूजा केली. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com