इंग्रजी शाळांत अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 29 मे 2017

महाराष्ट्र शासनाचा निर्णय, पहिली व दुसरीसाठीच प्रवेश

नांदेड : शहराच्या नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांत अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय, पहिली व दुसरीसाठीच प्रवेश

नांदेड : शहराच्या नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांत अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

राज्यात सन २०१० - ११ या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने सन २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी प्रवेशित करावयाचा लक्षांक दरवर्षी २५०० वरून २५ हजार एवढा वाढविण्यात आला आहे. तसेच शासन निर्णय योजनेअंतर्गत विद्यार्थी प्रवेश करावयाचा टप्पा पहिली ते पाचवी असा निश्‍चीत करण्यात आला होता. अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होण्याच्या दृष्टीने सुरूवातीच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्या बाबत अशा नामांकीत शाळांमार्फत विचारणा करण्यात आली होती. त्याबाबत ६ मे २०१७ रोजी सचीव स्तरीय समितीच्या बैठकित घेण्यात आलेल्या निर्णयास अनुसरून योजनेअंतर्गत विद्यार्थ्यी प्रवेश देण्यात यावा. १७ मे २०१६ नुसार विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवी प्रवेश देण्याबाबतची तरतूद रद्द करण्यात येत असून सन २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षापासून सदर योजनेअंतर्गत अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व इयत्ता दुसरी या दोन टप्प्यावरच प्रवेश देण्यास निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत जास्तीत जास्त विद्यार्थी निवड करून त्यांना लाभ देण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कार्यवाही करावी असे अव्वर सचीव रविंद्र औटे यांनी आदेशीत केले आहे.

ताज्या बातम्या-

Web Title: nanded news english medium school and admission