नांदेडः लोहा येथे शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

लोहा (नांदेड): लोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आज (सोमवार) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय स्टेट बँके समोर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी कर्जदार शेतकऱयांची यादी लावण्याचा आग्रह धरण्यात आला.

लोहा (नांदेड): लोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आज (सोमवार) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय स्टेट बँके समोर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी कर्जदार शेतकऱयांची यादी लावण्याचा आग्रह धरण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेद्वारे लोहा तालुक्यातील किती शेतकरी कर्जमुक्त झाले, किती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला त्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी बॅंकेच्या बाहेर लावण्यात यावी याकरीता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद पवार, तालुका प्रमुख बाळू पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे युवातालुका प्रमुख परमेश्वर मुरकुटे, युवा नेते भास्कर पवार, बाजार समिती सभापती बालाजी पाटील मारतळेकर, युवाउप शहरप्रमुख बंडु पाटील वडजे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र गायकवाड, दत्ता वाले, भानुदास पाटील पवार, बाळू थोरात, सरपंच राम पवार, माधव गायकवाड, अर्जुन राठोड यांच्यासह शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या वतीने भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शाखाधिकारी म्हणाले, "अजुन तरी कर्जमाफी विषयी आमच्याकडे शासनाचे किंवा वरिष्ठाचे कुठलेचे आदेश आलेले नाहीत. आदेश प्राप्त होताच कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांच्या यादया बँकेच्या बाहेर लावल्या जातील.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: nanded news loha shivsena farmer loan sbi