file photo
file photo

नांदेडची चिंता वाढली, दिल्ली इस्तेमातील दोघेजण बेपत्ता 

नांदेड : नवी दिल्ली येथील निझामुद्दीनमधील तबलीकी जमातच्या इस्तेमा कार्यक्रमासाठी नांदेडहून गेलेल्या लोकांच्या संख्या १३ नसुन ती फक्त ११ असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यापैकी आठ जणांची ओळख पटली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे तर एकावर पुणे येथे उपचार सुरू असून बेपत्ता दोघांचा कसुन शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे. 

नांदेड शहर व जिल्ह्यातून दिल्ली येथील निझामुद्दीन तबलीकी जमातच्या इस्तेमा कार्यक्रमासाठी ११ जण गेले होते. परंतु सुरवातीला १३ लोक गेल्याची चर्चा जिल्हाभर पसरली होती. मात्री ती केवळ अफवा असल्याचे प्रशासनाने सांगितले. फक्त ११ जण गेले होते त्यापैकी नांदेड शहरातील पाच तर ग्रामिण भागातून सहा जणांचा जथ्था होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर नवी दिल्ली येथून हे जथ्थे ता. १३ मार्चे ते १७ मार्चच्या दरम्यान परत आले होते. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी ‘त्या’ दोघांच्या शोधात

या इज्तेमा कार्यक्रमासाठी जवळपास दोन हजार लोक सहभागी झाले होते. त्यात ३०० हून अधिक जण विदेशी होते. एक हजार ३३ पैकी ३४ जणांना कोरोना पॉझीटीव्हचे संक्रमन झाले होते. त्यातील एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. ७०० जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून परतलेल्या लोकांचे पत्ते व मोबाईल क्रमांक संबंधीत राज्यातील पोलिस अधीक्षक यांना पाठविले आहे. त्यावरून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के आणि धनंजय पाटील यांनी जिल्हाभरात कसुन शोध घेतला. 

आठ जणांना क्वारंटाईन

त्यापैकी एकाला पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशाच्या द्रव्याचे नमुने घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. तर दोघांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच शोधून काढू असा विश्‍वास श्री. मगर यांनी व्यक्त केला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com