esakal | महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान होणार : केंद्रीय मंत्री नाईक 
sakal

बोलून बातमी शोधा

aayush mantri.jpg

महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व होमिओपॅथिक एज्युकेशन व रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनार सीरिजचा समारोप बुधवारी (ता. चार) झाला. त्यावेळी श्रीपाद नाईक यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान होणार : केंद्रीय मंत्री नाईक 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व होमिओपॅथिक एज्युकेशन व रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनार सीरिजचा समारोप बुधवारी (ता. चार) झाला. त्यावेळी श्रीपाद नाईक यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. तर डॉ. रामजी सिंग, आमदार क्रम काळे, पृथ्वीराज पाटील यांचा सहभाग होता.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महाविद्यालयाच्या संस्थापिका दिवंगत केशरबाई क्षीरसागर व महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे पूर्व संचालक दिवंगत डॉ. अनिल भाटिया यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा वेबिनार झाला. श्रीपाद नाईक म्हणाले, महाराष्ट्रात बीड उस्मानाबादसह पाच जिल्हा आयुष हॉस्पिटलला मान्यता देण्यात येईल.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

देशातील सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश कमी होत असल्याने नीट पर्सेंटाइल कमी करण्याबाबत विचार करणे सुरु आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लान्ट्स या संस्थेला केंद्र सरकारने महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यास राज्य सरकारने जागा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी राजेश टोपे म्हणाले, ज्या होमिओपॅथिक हॉस्पिटलनी कोविड सेंटर म्हणून काम केले ते खूप प्रशंसनीय आहे. प्रारंभी डॉ. अरूण भस्मे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समान संधी व समान वेतन दिल्या जात नाही, याकडे लक्ष वेधले. होमिओपॅथिक महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांना आयुश मंत्रालयाने अनुदान द्यावे अशी मागणीही केली. सूत्रसंचालन प्राचार्य महेंद्र गौशाल यांनी केले. तर आभार हेरीचे संचालक डॉ. किशोर मेहता मानले. डॉ. अंजली पांगारकर, डॉ.अतिक, डॉ. शेख जफर, डॉ.पुनम शिंदे, डॉ. वैभव शहापूरे, डॉ. अंजली क्षीरसागर, डॉ. अनिस अहेमद, प्रा. हांगे, डॉ. जोशी, डाँ.शेख नासेर, डॉ. नवाज अली, डॉ. जायभाय, डॉ. बिक्कड यांचा सहभाग होता. 

(संपादन-प्रताप अवचार)