लातूरकरांना दिलासा : मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ

लातूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात रात्रीतून पाच दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे.
लातूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात रात्रीतून पाच दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीपातळी रात्रीतून पाच दशलक्ष घनमीटरने वाढली आहे. त्यामुळे धरणाच्या मृत साठ्यात सध्या २३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे; पण पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात या धरणात पाणीसाठा झाला नव्हता; पण परतीच्या पावसाने धरणाच्या मृतसाठ्यात काहीअंशी पाणी आले होते. त्यामुळे लातूरकरांना आतापर्यंत या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकला आहे.

सध्या दहा दिवसांआड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात मृतसाठ्यातील पाणीसाठाही कमी होऊ लागला होता; पण गेल्या काही दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे.

धरणाच्या वरच्या भागातील नदी, नाले वाहू लागल्याने आता पाणी धरणात येऊ लागले आहे. बुधवारी रात्रीतून पाच दशलक्ष घनमीटर पाणीपातळी वाढली आहे. मंगळवारी (ता.३०) धरणातील मृतसाठ्यात १८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तर बुधवारी सकाळी तो २३ दशलक्षघनमीटर झाला आहे. 

मृतसाठ्यातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने लातूरकरांसाठी समाधानाची बाब आहे. या पाण्यामुळे पुढील काही महिने पाणी पुरवठ्याची सोय होणार आहे. त्यामुळे या पाण्याने लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. धरणात पाणी येण्यासाठी पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. 
 

मांजरा धरणात एका रात्रीतून पाच दशलक्षघनमीटर पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात मृतसाठ्यात २३ दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. असाच पुरवठा पुढे सुरू ठेवला तर डिसेंबरपर्यंत या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. 
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com