निलंगा : सरकारी डॉक्टरची खासगी प्रॅक्टीस आली अंगलट..! तब्बल १९३ जणांना केले क्वारंटाईन 

corona image.jpg
corona image.jpg

निलंगा (लातूर) : निलंगा तालुक्यातील कासारशिरशी येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच मंगळवारी (ता.७) कोरोना बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली. या डॉक्टरने सरकारी कर्तव्या बरोबरच खाजगी प्रॅक्टिस केल्यामुळे संपर्कातील १९३ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खाजगी प्रॅक्टिस चांगलीच अंगलट आली असून उस्तुरी सह अन्य गावातील त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करावे लागले. 

निलंगा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  चार दिवसापासून निलंगा येथे अचानक अनेकांना कोरोना संसर्ग झाला आहे. शिवाय कासार शिरशी येथील सरकारी दवाखान्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाच कोरोना झाला आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळले आहेत. तेथे तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले या अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कंटेनमेंट झोन तयार करण्यात येत आहे. 

संबंधित डॉक्टरचा अहवाल कोरोना बाधित आल्यामुळे त्यांच्या उस्तुरी व काससी येथील खाजगी प्रॅक्टिस असलेल्या ठिकाणचे व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या १९३ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील दोन व्यक्तींची स्वॕब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
 औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

उस्तुरी येथे संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून गावात घराबाहेर कोणी नसल्यामुळे शुकशूकाट दिसत आहे. त्यांच्या संपर्कातील आलेल्या किती लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय निलंगा शहरांमध्ये रामकृष्ण नगर ते शिवाजीनगर दत्तनगर इंद्राचौक पीर पाशा दर्गा आदी ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आव्हान उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com