esakal | निवृत्ती महाराजांच्या पाठीशी भाजपचा हा बडा नेता
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

''महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर काय,'' असा सवाल धस यांनी केला. आमदार सुरेस धस यांनी ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे.

निवृत्ती महाराजांच्या पाठीशी भाजपचा हा बडा नेता

sakal_logo
By
निसार शेख

कडा (जि. बीड) : ‘निवृत्ती महाराज इंदुरीकर जे बोलले, ते गुरु चरित्रातच आहे. मग त्यात गैर काय,' असा प्रश्न उपस्थित करत आमदार सुरेश धस यांनी आपण इंदुरीकर महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत,” असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी निवृत्ती महाराज यांचे समर्थन केले आहे.

''कोणीतरी काहीतरी बोललं, म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव करावी वाटते. जर इंदोरीकर महाराजांवर कारवाई केली, तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

''महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर काय,'' असा सवाल धस यांनी केला. आमदार सुरेस धस यांनी ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे.

''पीसीपीएनडीटी कायदा आणि इंदुरीकर महाराज बोलले याचा काय संबंध आहे? राज्य सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली, याची मला कीव करावीशी वाटते. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन जे कीर्तन करतात, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तन ऐकलं जातं,'' असंही धस म्हणाले.

आमचे जुळले, तुमचे कसे जुळले जरा सांगा की...

''महाराज जे बोलले, ते गुरु चरित्रामधील आणि पुराणातील सप्रमाण दाखले आहेत. उठसूट एका धर्माच्या पाठीमागे लागणं योग्य नाही. आधी शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज यांच्या पाठीमागे लागले आहेत. कोणी काही बोललं म्हणून राज्य सरकारने महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव येते.''

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

''नोटिसीपेक्षा पुढची कारवाई केली, तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. जर कारवाई केली, तर आम्ही शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांची बाजू घेऊ,'' असं ही धस यांनी सांगितलं.

loading image