esakal | उमरगा : कोविड रुग्णालयात आता नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा कोविड हॉस्पिटल.png
  • उपजिल्हा रुग्णालयात बाह्य, आंतररूग्ण विभागातील सेवा सुरू. 
  • सूती आणि सिझेरियनची सोय सुरू झाल्याने सामान्य रुग्णांना दिलासा
  • उमरग्यातील कोविड रुग्णालयाचा स्वंतत्र कक्ष सुरु रहाणार. 

उमरगा : कोविड रुग्णालयात आता नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : येथील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे कोविड रुग्णालय करण्यात आले होते. दरम्यान गेल्या सहा महिन्यापासुन बाह्य, आंतररूग्ण विभाग बंद असल्याने साध्या आजारासाठीही खाजगी रुग्णालये गाठावे लागले. प्रसूती व सिझेरियनसह मायनर शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या पर्यायी सरकारी रुणालय व खाजगी रुग्णालयात जावे लागले. मात्र आता मंगळवारपासून (ता.१७) नॉन-कोविड रूग्णालय सुरू करण्यात आल्याने सामान्य कुटुंबातील लोकांना दिलासा मिळाला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहरातील शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीसाठी दररोज गर्दी असते. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या भितीने शहर व ग्रामीण भागातील अनेक नागरिक तपासणीसाठी येत होते मात्र या रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रूग्णालयासाठी केल्यानंतर गेल्या पाच - सहा महिन्यापासुन अनेक रुग्णांना परतावे लागत होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुग्णालयातील प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया गृह बंद असल्याने शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना ऐनवेळी पर्याय शोधत धावपळ करावी लागली. ग्रामीण भागात मूळज, नाईचाकूर, आलूर आणि येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीची सोय आहे मात्र तेथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची मोजकी संख्या लक्षात घेता तेथेही अनेक अडचणी आल्या. दरम्यान कोरोनाच्य काळात सास्तूरचे स्पर्श ग्रामीण रुग्णालय महिलांसाठी मोठा आधार ठरले. उमरगा, लोहारा तालुक्यातील बहुतांश सरकारी रुग्णालयाची बाह्य व अंतर रूग्णसेवा कोरोना काळात बंद असल्याने "स्पर्श" च्या मायेचा हात अनेकांना धीर दिला. सर्वाधिक प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रिया या रूग्णालयात झाल्या.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगळवारपासून सुरू झाली सेवा

दोन मजली इमारत असलेल्या रुग्णालयात वरच्या मजल्यावर कोविड रुग्णालय कार्यरत रहाणार आहे. खालच्या मजल्यात सर्व आजारासाठी बाह्य आणि आंतररूग्ण विभागातील सेवा मंगळवारपासुन सुरू करण्यात आली आहे. कांही तांत्रिक त्रुटी दूर करून शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालय खास कोरोनाग्रस्त रुग्णासाठी कार्यरत होते. मंध्यतरी रुग्ण संख्या वाढल्याने नॉन - कोविड रुग्णालयाची सुविधा सुरू करणे शक्य नव्हते. सध्या वरच्या मजल्यावर कोविड रूग्णालयाचे ऑसूलेशन कक्ष व आयसीयू कक्ष कार्यरत आहे. पूर्वीप्रमाणे पहिल्या मजल्यातील बाह्य व आंतररूग्ण सेवा सुरू करण्यात आली असून रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. - डॉ. अशोक बडे , वैद्यकिय अधिक्षक

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top