दहावी-बारावीच्याही ऑनलाइनसह ऑफलाइन परीक्षा!

Ten pariksha.jpg
Ten pariksha.jpg
Updated on

जालना : जवळपास सहा महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे.यातच दहावी-बारावी पुरवणी परीक्षा,बारावी परीक्षा आवेदनपत्र प्रक्रियेसह नियोजन बिघडले आहे. पुढील दहावी व बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाइन तसेच ऑफलाइन घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने मागील मार्च महिन्यापासून परीक्षा मंडळाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जूलै महिन्यात होणाऱ्या दहावी बारावी पुरवणी परीक्षेबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. मंडळाने याबाबत निर्णय घेतला नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामुळे परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्कच मंडळाने रद्द करावे,असे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. पुरवणी परीक्षा कधी आणि कशा होतील याबाबत मोठा संभ्रमात विद्यार्थी असल्याचे प्राचार्य श्रीनाथ वाढेकर यांनी सांगितले आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र दरवर्षी भरण्यासाठी राज्य मंडळ आदेश काढत असते. 

परंतु यंदा सहा महिन्यापासून शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे.यात दहावी बारावीचा किती अभ्यासक्रम पूर्ण झाला याची माहिती जरी 'अध्ययन अध्यापन ऑनलाइन अहवाल 'मध्ये भरली जात असली तरी किती विद्यार्थ्यापर्यंत परिणामकारक शिकविणे झाले याचे निश्चित परिणाम ठरविणे अवघड आहे. यामुळेच पुढील परीक्षेबाबत राज्य मंडळात युद्धपातळीवर नियोजन सुरु असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होतील,असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलणार हे निश्चित आहे. राज्यात कल चाचणीच्या धर्तीवर दहावी- बारावी बोर्ड परीक्षा या ऑनलाइन-ऑफलाइन घेण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. राज्यातील माध्यमिक शाळेत आयसीटी संगणक लॅब देण्यात आलेल्या आहेत. यावर दरवर्षी राज्य मंडळ कलचाचणी घेतली जाते. अशा अनेक कारणांनी ऑनलाइन परीक्षेबाबत विचार होऊ शकतो,असे प्रा.संजय चौधरी यांनी सांगितले आहे. 

संभाव्य शक्यता 
• तोंडी परीक्षेऐवजी प्रकल्प असावेत. 
• एकूण गुण कमी होतील. 
• अभ्यासक्रम कमी होईल. 
• परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय 
• शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा. 

सध्याची परिस्थिती पाहता परीक्षेत बदल होणे अपेक्षित आहे.कल चाचणीच्या धर्तीवर ऑनलाइन ऑफलाइन पर्याय होवू शकतो. एकूण गुण व स्वरूप बदलावे लागेल. 
प्रा. अरुण कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com