Breaking: बीडमध्ये खिडक्याच्या दुकानात स्फोटात एक ठार; तीघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

कोटींग पावडर, स्लाईडींग खिडक्या बनविणाऱ्या दुकानात गॅस गळतीनंतर स्फोट होऊन ३० वर्षीय तरूण ठार झाला. शहरातील पांगरी रस्त्यावरील करपरा नदीजवळील दुकानात मंगळवारी (ता.२५) ही घटना घडली.

बीड: कोटींग पावडर, स्लाईडींग खिडक्या बनविणाऱ्या दुकानात गॅस गळतीनंतर स्फोट होऊन ३० वर्षीय तरूण ठार झाला. शहरातील पांगरी रस्त्यावरील करपरा नदीजवळील दुकानात मंगळवारी (ता.२५) ही घटना घडली.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

या घटनेत संतोष गिराम या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. शहरातील पांगरी रोडवरील करपरा नदी जवळ संतोष गिराम या तरूणाचे स्लाईडींग खिडक्या बनविण्याचा व्यवसाय आहे. दुपारी वाजण्याच्या दरम्यान गॅस गळती होऊन त्याचा स्फोट झाला.

यात संतोष गिराम हा तरूण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाला. तर काम करणारे अन्य तिघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर करपरा नदीचा परिसर हादरला होता. घटनास्थळी पोलिस पोचले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचाः हमालानेच लांबविले अडीच लाखांचे दागिने, नविन घरी सामान शिफ्ट करताना मारला डल्ला  

पोलिस शिपाई अटकेत 

औरंगाबाद: लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित करुन पिडितेचे लग्न मोडण्यासाठी पिडितेच्या भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठविणारा आरोपी तथा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाला सायबर पोलिसांनी सोमवारी (ता.२४) रात्री अटक केली. रविंद्र कडुबा दाभाडे (३६, रा. सिध्दार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?   

संपादनः सुषेन जाधव
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Death In Blast Beed News