esakal | बीडमध्ये दोन अपघातात एक ठार; चौघे जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

accident.jpg

जिल्ह्यात मंगळवारी (ता. एक) दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर चौघे जखमी झाले. पहिली घटना कोळवाडी (ता. बीड) येथे तर दुसरी घटना परळी-सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडली.

बीडमध्ये दोन अपघातात एक ठार; चौघे जखमी 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. एक) दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर चौघे जखमी झाले. पहिली घटना कोळवाडी (ता. बीड) येथे तर दुसरी घटना परळी-सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
शंकर तात्या जाधव (वय ७०, रा. कोळवाडी, ता. बीड) हे मंगळवारी सकाळी रस्ता ओलांडत होते. भरधाव टेम्पोने (क्रमांक एम. एच. १९ झेड ९४९७) त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चालक दिनेश दौलत जाधव (रा. बीलवाडी, ता. जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. घटनास्थळी फौजदार श्री. गिते, फौजदार श्री. घोडके, श्री. जाधवर, शेख अल्ताफ, विलास ठोंबरे, किशोर जाधव, मारोती म्हेत्रे, विठ्ठल सांगळे, सुदाम वनवे, विकास थोरात यांनी जाऊन पंचनामा केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसरा अपघात परळी सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडला. एका रिक्षाला (एमएच २३ टीआर ३११) अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात शिवमूर्ती रोडे, वनुबाई माने, आशाबाई फड, सागरबाई फड व अन्य लहान मुले जखमी झाले. जखमींना परळी व अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)