esakal | Corona Update : उस्मानाबादेत दिवसभरात १३ पॉझिटिव्ह, अँटीजेन टेस्टमध्ये आढळले पाच रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये १३ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली असुन त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ४४९ वर पोहचली आहे. त्यामध्ये २७२ रुग्णावर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर मृत्युची संख्या २० वर पोहचली आहे. सध्या १५७ रुग्णावर उपचार सूरु आहेत.

Corona Update : उस्मानाबादेत दिवसभरात १३ पॉझिटिव्ह, अँटीजेन टेस्टमध्ये आढळले पाच रुग्ण 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.१४) दिवसभरात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे.  जिल्हा रुग्णालय येथून १०५ स्वॅब नमूने तपासणीसाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपिड अँटीजेन किट्सच्या माध्यमातून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेले व तेथेच उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची जिल्हयाच्या पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

रुग्णामध्ये उस्मानाबाद शहरातील खडकपुरा भागातील एकाचा समावेश आहे. तर उमरगा तालुक्यातील ५० वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या शहरातील धनश्री कॉलनी येथील रहिवाशी आहेत. तुळजापूर तालुक्यात दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ३९ वर्षे पुरुष (रा.वडगाव दे.), १३ वर्षीय मुलगी (रा. जळकोट), ५५ वर्षीय महिला रा. आळंद (कर्नाटक ) उमरगा येथे पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला जिल्ह्यात तात्पुरते समाविष्ट करण्यात आले आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

रॅपिड अँटीजेन किट्सच्या माध्यमातून (ता.१५) रोजी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये २० वर्षीय पुरुष (रा. माळी गल्ली, खिरणी मळा), ५९ वर्षीय पुरुष (रा, उपळा (मा ) ता. उस्मानाबाद), ४० वर्षीय महिला (रा. खानापूर ता. उस्मानाबाद), १७ वर्षीय पुरुष (रा. खानापूर ता. उस्मानाबाद), ५५ वर्षीय पुरुष (रा. रत्नापूर ता. परांडा) या रुग्णांचा समावेश आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

बुधवारी (ता.१५) बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेला व तेथेच उपचार घेत असलेले तीन रुग्णाची जिल्हयाच्या पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. ६० वर्षे पुरुष (रा.बाऊची ता. परांडा) हा रुग्ण बार्शी येथे उपचार  घेत आहे. ६० वर्षीय पुरुष (रा. कळंब) हे रुग्ण सोलापूर येथे उपचार घेत आहेत. ६९ वर्षीय पुरुष (रा. मुरूम ता. उमरगा) या रुग्णास लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. (ता. १५) रोजी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे. ६५ वर्षे पुरुष (रा.गुंजोटी ता उमरगा) व  ६६ वर्षीय पुरुष (रा. तुरोरी ता. उमरगा) या दोन रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

१३ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली असुन त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ४४९ वर पोहचली आहे. त्यामध्ये २७२ रुग्णावर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर मृत्युची संख्या २० वर पोहचली आहे. सध्या १५७ रुग्णावर उपचार सूरु आहेत.

(संपादन : प्रताप अवचार)

loading image
go to top