corona 12.jpg
corona 12.jpg

Coronavirus : उस्मानाबादेत दिवसभरात ३१८ पॉझिटिव्ह, तर कोरोनाबळींची संख्या झाली एवढी !  

Published on

उस्मानाबाद : जिल्ह्यामधील कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस अतिशय वेगात वाढत आहे. बुधवारी ता.१६ दिवसभरात जिल्ह्यात ३१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही शिवाय मृत्यूचा आकडाही काही कमी होताना दिसत नाही. दिवसभरात १५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

या भागातील रुग्णांचा आहे मृत्यूत समावेश 
कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ८० वर्षीय स्त्रीचा कळंब उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. लोहारा तालूक्यातील जेवळी येथील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. उस्मानाबाद तालुक्यातील ब्रम्हाचीवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. तर उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावातील ८० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुळजापुर तालुक्यातील ढेकरी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा तुळजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. तर बार्शी तालुक्यातील अल्जापुर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. आज दिवसभरात झालेल्या  सहा मृत्यूमुळे एकूण कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा २६७ वर गेला आहे. 

बुधवारी आलेल्या ३१८ रुग्णांपैकी १४२ जण आरटीपीसीआरद्वारे तर १६३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातही उस्मानाबाद तालूक्यात पुन्हा एकदा शंभरी गाठल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यामध्ये १०९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये २६ जण आरटीपीसीआरद्वारे तर ७९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. चार जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत.

तुळजापुर तालूक्यातील ३२ जणांना लागन झाली. त्यामध्ये नऊ जण आरटीपीसीआरद्वारे तर १८ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इतर जिल्ह्यामध्ये पाच जणांना बाधा झाली आहे. उमरगा येथे ५२ जणांना लागण झाली. ३७ जण आरटीपीसीआरद्वारे तर १३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. दोन जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. कळंबमध्ये ४५ जण बाधित असून त्यामध्ये १९ जण आरटीपीसीआरद्वारे तर २६ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वाशी येथे ३९ जणांना लागन झाली असुन २९ जण आरटीपीसीआरद्वारे तर नऊ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. शिवाय एक जण इतर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आला आहे. भुम १७, लोहारा १४ व परंडा दहा अशी तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या आढळून आली आहे. 

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - ९२९९
  • बरे झालेले रुग्ण - ६७९९
  • उपचारावरील रुग्ण- २२३३
  • एकुण मृत्यु - २६७ 
  • आजचे बाधित - ३१८ 
  • आजचे मृत्यु - ०६

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com