उस्मानाबाद कोरोना : १३३ पॉझिटिव्ह, १४९ झाले बरे !

तानाजी जाधवर
Thursday, 1 October 2020

उस्मानाबाद कोरोना मीटर वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ३८० वर गेली आहे. 

उस्मानाबाद :  जिल्ह्यामध्ये गुरुवारी एकुण १३३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच १४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर ३.९ टक्के इतका वाढला आहे. मृत्युदराप्रमाणेच रिकव्हरी रेट देखील वाढत असुन ७७.४७ टक्क्यावर पोहचला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्ह्यामध्ये १३३ रुग्णांमध्ये १४ जण आरटीपीसीआर तर १०९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील रुग्णांची संख्या अजूनही वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये पुन्हा ३७ रुग्णांची वाढ झाली आहे. यात ३१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तीन जणांचे आरटीपीसीआरद्वारे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिवाय तीन जणांना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. वाशी तालुक्यात ३४ रुग्णांची वाढ झाली असुन त्यामध्ये २९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर चार जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. एक जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. परंड्यामध्ये २०, भुम मध्ये १४, कळंबमध्ये १७, तुळजापुर सात व उमरगा चार अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या वाढली आहे. लोहारा तालुक्यामध्ये गुरुवारी एकही रुग्ण सापडला नसल्याने दिलासादायक वातावरण आहे. 
 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाच जणांचा मृत्यू
तुळजापुर शहरातील ७५ वर्षीय महिलेचा तेथील उपजिल्हा रुग्णालय येथे मृत्यु झाला आहे. परंडा तालुक्यातील वाकडी गावच्या ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे मृत्यु झाला आहे. भुम शहरातील ८० वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पवारवाडी येथील ५५ वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहरातील मारवाड गल्ली येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. एकुण मृत्युची संख्या आता ३८० वर पोहचली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - १२३०५
  • बरे झालेले रुग्ण- ९५३३
  • उपचाराखालील रुग्ण- २३९२
  • एकुण मृत्यु - ३८० 
  • आजचे बाधित - १३३ 
  • आजचे मृत्यु - ०५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update news