esakal | उस्मानाबाद कोरोना : आज १०७ पॉझिटिव्ह, रिकव्हरी रेट ७९ टक्क्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

उस्मानाबादसाठी दिलासादायक बाब म्हणजे जिल्हाभरातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसुन येत आहे, आता हे प्रमाण ७९ टक्के पर्यंत पोहचले आहे.

उस्मानाबाद कोरोना : आज १०७ पॉझिटिव्ह, रिकव्हरी रेट ७९ टक्क्यावर

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी १०७ नवीन रुग्णांची भर पडली. तर दोन जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. शनिवारी एका दिवसात २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासा देणारी बाब समोर आली आहे. बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसुन येत आहे, आता हे प्रमाण ७९ टक्के पर्यंत पोहचले आहे. असे असले तरी जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे तो वाढत्या मृत्यु दराचा. मृत्यु होण्याचे प्रमाण ३.०९ टक्के आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना होण्याचे प्रमाण जिल्ह्यामध्ये २०.५६ टक्क्यावर पोहचले आहे. या सगळ्यामध्ये जिल्हयाच्या बाहेर बाधित आलेल्याची संख्या पकडण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ८,१७९ व्यक्ती होम क्वारंटाईन तर ११३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत जवळपास दहा हजार रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रिकव्हरी रेट चांगलाच वाढत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
जिल्ह्यामध्ये शनिवारी आलेल्या १०७ रुग्णापैकी १७ जण आरटीपीसीआरद्वारे व ९० जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातही उस्मानाबाद तालुक्यात २३ जण बाधित झाले आहेत. त्यामध्ये सर्व बाधिताची अँटिजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली आहे. तुळजापुर तालुक्यातील १० जण बाधित आहेत. त्यामध्ये दोन जण आरटीपीसीआरद्वारे तर आठ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा येथे सात रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सहा जणांची अँटजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर एक जण आरटीपीसीआरद्वारे बाधित झाल्याचे दिसुन येत आहे. लोहारा तालुक्यात दहा जणांना बाधा झाली असुन ते सर्व अँटिजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. कळंबमध्ये १९ जण बाधित झाले आहेत. त्यात सात जण आरटीपीसीआरद्वारे व १२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वाशीमध्ये आठ जणाना लागन झाली असुन चार जण आरटीपीसीआरद्वारे व चार जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा येथे २१ जणांना लागन झाली असुन त्यामध्ये १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर दोन जण आरटीपीसीआरद्वारे बाधित झाले आहेत. भुममध्ये नऊ जणांना कोरोनाची लागन झाली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन मृत्यू
भुम तालुक्यातील ईट गावच्या ५० वर्षीय स्त्रीचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. तर वाशी शहरातील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. 

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - १२५७१
  • बरे झालेले रुग्ण - ९९२७
  • उपचाराखालील रुग्ण- २२५५
  • एकुण मृत्यु - ३८९

(संपादन-प्रताप अवचार)

loading image