esakal | Osmanabad Corona : दिवसभरात १३५ पॉझिटिव्ह, तीन वृद्धांचा मृत्यू; बाधितांची संख्या पाच हजारावर  
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

बुधवार (ता.२६) रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये आरटीपीसीआरमधुन ८६ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधुन ४९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Osmanabad Corona : दिवसभरात १३५ पॉझिटिव्ह, तीन वृद्धांचा मृत्यू; बाधितांची संख्या पाच हजारावर  

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आज बुधवारी (ता.२६) १३५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर तीन वृद्ध कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या १३१ वर गेली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मृतामध्ये तुळजापुर तालुक्यातील करजखेडा गावचे ६५ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. त्याचा तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान (ता.२६) मृत्यु झाला आहे. परंडा तालुक्यातील शेलगावच्या ७२ वर्षीय वृध्दाचाही जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान (ता.२६) रोजी कोरोनाने बळी गेला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावच्या ७० वर्षीय वृध्द महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान (ता.२६) रोजी कोरोनाने मृत्यु झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बुधवार (ता.२६) रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये आरटीपीसीआरमधुन ८६ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधुन ४९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजाराच्या पुढे गेली आहे. १३५ रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये ३६, तुळजापुर १२, उमरगा १७, कळंब २०, परंडा १९, लोहारा ११, भुम १८ तर वाशीमधील रुग्णांचा समावेश आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद शहरामध्ये भाननगर पाच, दत्त कॉलनी एक, अक्षय हॉस्पीटल दोन, तांबरी विभाग एक, धारासुर मर्दीनी मंदीर परिसरामध्ये दोन, गांधी नगर एक, आनंद नगर दोन, जिजाऊ नगर एक, बार्शी नाका परिसर एक, गवळी वाडा दोन, शिक्षक कॉलनी एक, मिली कॉलनी एक तालुक्यातील आळणी येथे एक, येडशी एक, भंडारी एक, करजखेडा दोन,पळसवाडी तीन, रुईभर दोन, उपळा एक आदी गावामध्ये नव्याने रुग्ण सापडले आहेत.

शंभर रुग्णांना डिस्‍चार्ज 
बुधवारी दिवसभरामध्ये शंभर रुग्णाना उपचार करुन घरी सोडुन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या पाच हजार पाच इतकी झाली आहे. तर त्यातील २९०८ इतक्या रुग्णांना उपचार करुन घरी सोडुन देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये १,९६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

loading image