उस्मानाबाद कोरोना अपडेट : दिवसभरात १४ रुग्णांची भर, एकाचा मृत्यू, बळींची संख्या ३५ वर

तानाजी जाधवर
Saturday, 25 July 2020

जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात १४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यु झाला असुन जिल्ह्यातील एकुण रुग्णाची संख्या आता ६३३ वर गेली आहे. 

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात १४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यु झाला असुन जिल्ह्यातील एकुण रुग्णाची संख्या आता ६३३ वर गेली आहे. रात्री उशीरा आलेल्या सहा जणासह दुपारी आलेल्या अहवालामध्ये सहा व बाहेर ३५ उपचार घेत असलेल्या दोन जणांची यामध्ये वाढ झाली आहे. 
 कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

जिल्हा रुग्णालय येथून (ता.२४) रोजी २०९ स्वॅब नमुने तपासणी साठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्व अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्याबाहेरील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वाशी तालुक्यातील तीन, कळंब, लोहारा, भूम प्रत्येकी एक असे एकूण सहा जणांचा समावेश आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

२० वर्षीय स्त्री, रा तेरखेडा ता. वाशी, ४५ वर्षीय स्त्री, रा.तेरखेडा ता. वाशी, ७५ वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता वाशी यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ३८ वर्षीय पुरूष रा. डिकसळ ता. कळंब लोहारा, ६५ वर्षीय पुरुष रा. जुन्या तहसील जवळ, फतेमा नगर लोहारा हे औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. ६५ वर्षीय स्त्री कोष्टी गल्ली भुम, यांच्यावर बार्शी येथे उपचार सूरु आहेत. ७५ वर्षीय तेरखेडा येथील पुरुषाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३५ वर पोहचली आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शुक्रवारी (ता. २४ ) रोजी जिल्हा रुग्णालय येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे उस्मानाबाद तालुक्यातील २८ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी २७ रिपोर्ट्स आज दुपारी प्राप्त झाले आहेत. तसेच  जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ४८ वर्षीय स्त्री, रा. मारवाड गल्ली, उस्मानाबाद, ५० वर्षीय पुरूष, रा. वडगाव सिद्धेश्वर ता. उस्मानाबाद, ३३ वर्षीय पुरुष रा. सिद्धार्थ नगर, सांजा रोड उस्मानाबाद, ५० वर्षीय पुरूष रा. टाकळी ढोकी ता. उस्मानाबाद, २५ वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद, २५ वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद, ५० वर्षीय पुरूष रा. घुगी ता. उस्मानाबाद सोलापूर येथे उपचार घेत आहेत. ४५ वर्षीय स्त्री रा. बार्शी नाका, यशवंत नगर उस्मानाबाद या सुध्दा सोलापूर येथे उपचार घेत आहे जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ६३३ झाली आहे. एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण ४१४ असुन सध्या जिल्ह्यातील एकूण उपचार घेत असलेले रुग्ण १८४ आहेत.

edited by pratap awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad corona Update Today 14 new corona positive