Corona-Virus : उस्मानाबादेत आज १७४ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या पोहचली दीड हजारावर 

तानाजी जाधवर
Sunday, 2 August 2020

जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या एक हजार ४५४ इतकी झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती ८९१ वर गेली आहे. उपचारानंतर घरी गेलेले रुग्ण ५१६ आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी आलेल्या अहवालामध्ये १७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये उमरगा येथे ६३ रुग्णाचा समावेश आहे. तसेच उस्मानाबाद ५४ तर तुळजापुर तालुक्यात ४४ अशी रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे.  

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

जिल्हा रुग्णालय येथुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे एकुण ५१३ स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील ४७८ अहवालप्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १७४ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असुन तर २६० निगेटिव्ह आले आहेत. अजुनही ४४ अहवाल प्रलंबित आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

उस्मानाबाद शहरातील ओम नगर एक, स्त्री रुग्णालय दोन, आडत लाईन एक, शासकीय तंत्रनिकेतन एक, शंकर नगर एक, शिवाजी नगर, एक,सावरकर चौक एक, विद्यानगर एक, काकडे प्लॉट सहा, ज्ञानेश्वर नगर एक, शिक्षक कॉलनी एक, उंबरे कोठा दोन, नाईकवाडी नगर एक, पारीजातक अपार्टमेंट दोन, दत्त नगर एक, देवकते गल्ली दोन, आनंद नगर दोन, दर्गा रोड दोन,हनुमान चौक तीन, धाराशिव मर्दीनी परिसर  एक, जिल्हा कारागृह एक, जिल्हा रुग्णालय एक आदी भागात रुग्ण सापडले आहेत. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

तर तालुक्यातील बेंबळी, सारोळा, रुईभर, येडशी, तेर, गोरेवाडी, जुनोनी आदी गावामध्ये रुग्ण आढळुन आले आहेत. तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे १८ रुग्णाची भर पडली आहे. त्या शिवाय शहरातील पुष्पविहार येथे आठ रुग्ण आढळले आहेत. नळदुर्ग पोलीस ठाण्यातील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. कळंब तालुक्यात तीन, परंडा येथे सहा, लोहारा तीन व वाशी एक अशी रुग्णसंख्या आढळुन आली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या एक हजार ४५४ इतकी झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती ८९१ वर गेली आहे. उपचारानंतर घरी गेलेले रुग्ण ५१६ आहेत.

Edit-pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update today 174 new corona patient