esakal | उस्मानाबाद कोरोना अपडेट : दिवसभरात १८२ पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढून ६६.५९ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यामध्ये चोवीस तासात मयत झालेल्या पाच रुग्णापैकी तीन जण उस्मानाबाद तालुक्यातील असुन दोन तुळजापुर तालुक्यातील आहेत.

उस्मानाबाद कोरोना अपडेट : दिवसभरात १८२ पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी १८२ रुग्णांची वाढ झाली आहे. तर पाच जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तर विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले ३६२ रुग्ण दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहे. ही बाब दिलासादायक ठरली आहे.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढून ६६.५९ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यामध्ये चोवीस तासात मयत झालेल्या पाच रुग्णापैकी तीन जण उस्मानाबाद तालुक्यातील असुन दोन तुळजापुर तालुक्यातील आहेत.

मृत्यूत यांचा समावेश 

उस्मानाबाद शहरातील झाडे गल्ली येथील ६५ वर्षीय पुरुष, उस्मानाबाद तालुक्यातील कावळे वाडी येथील पुरुष, उस्मानाबाद तालुक्यातीलच बावी येथील ३७ वर्षीय पुरुष या तिघांचाही जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नळदुर्ग येथील ६९ वर्षीय महिलेचा उस्मानाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. तुळजापूर शहरातील एका ५७ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुकानिहाय आज आढळून आलेले रुग्ण 

दिवसभरामध्ये आलेल्या १८२ रुग्णापैकी ८२ जण आरटीपीसीआरमधुन तर ८८ जणाची अँटिजेन टेस्टमधून पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्याचे प्रमाण पुन्हा एकदा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यातही अँटिजेन टेस्टमध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सहा जण आरटीपीसीआरमधून तर ४२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चार जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. असे एकुण ५२ जण तालुक्यामध्ये बाधित झाले आहेत.

तुळजापुरमध्ये आकडा कमी आला असुन गेल्या काही दिवसापासुन दुहेरी आकड्यात असणारी संख्या आज सहा वर आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उमरगा येथे २३ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये १६ जण आरटीपीसीआर व सहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एक रुग्ण परजिल्ह्यामध्ये बाधित झाला आहे. 

कळंब तालुक्यामध्ये एकुण दहा रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये आठ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर दोघे परजिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरीत आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. 

परंडा यथे २६ जण पॉझिटिव्ह आले असुन त्यामध्ये १६ जण आरटीपीसीआर मधुन तर नऊ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एक जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाला आहे.

लोहारा तालुक्यामध्ये ३४ जण बाधित झाले असुन त्यामध्ये आरटीपीसीआरमध्ये १६ व अँटिजेनमधुन १६ इतर परजिल्ह्यातुन दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. भुम तालुक्यात १२ व वाशीमध्ये १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image