esakal | उस्मानाबाद कोरोना मीटर; आजचे पॉझिटिव्ह, मृत्यूची संख्या वाचा सविस्तर ! 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेल्यामध्ये सहा जणांपैकी तीन जण उस्मानाबाद तालूक्यातील आहेत. तर उमरगा, तुळजापुर व वाशी येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर; आजचे पॉझिटिव्ह, मृत्यूची संख्या वाचा सविस्तर ! 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १९२ रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ५२५ रुग्ण बरे होऊन गेल्याची दिलासादायक बाब ठरली आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगलाच वाढल्याचे दिसुन येत आहे. हा दर ७१.५७ टक्के इतका वाढला आहे. एका दिवसापुर्वी हा दर ६५ टक्के इतका होता. आजच्या एका दिवसामध्ये जवळपास सहा टक्यानी रिकव्हरी रेट वाढल्याने आरोग्य विभागात दिलासादायक वातावरण आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यामध्ये मृत्यु झालेल्यामध्ये सहा जणापैकी तीन जण उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. तर उमरगा, तुळजापुर व वाशी येथे प्रत्येकी एक मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहरातील तांबरी विभाग येथील ७८ वर्षीय पुरुष , तालुक्यातील तेर येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. कामेगाव येथील ८३ वर्षीय पुरुषाचा सोलापुरच्या खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला. वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील ८५ वर्षीय पुरुष, उमरगा तालुक्यातील गुंजोटी ८२ वर्षीय पुरुष, तुळजापुर तालुक्यातील वेताळनगर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
जिल्ह्यामध्ये आज आढळलेल्या १९२ रुग्णापैकी ११७ जण आरटीपीसीआर मधुन तर ७० जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पाच जण इतर जिल्ह्यात बाधित झाल्याची नोंद आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये ७८ जणांना बाधा झाली असुन यामध्ये ४९ जण आरटीपीसीआरद्वारे व २९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. तुळजापुरमध्ये नऊ जण बाधित झाले आहेत. उमरगा येथे २१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यातील १४ जण आरटीपीसीआरमधुन पॉझिटिव्ह आले असुन सहा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब तालुक्यातील ३० जणाना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामध्ये १९ जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले तर दहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भुममध्ये तीन जण व परंडा येथे नऊ जण पॉझिटिव्ह आले आहेत. लोहाऱ्यामध्ये २० जणांना लागन झाली तर वाशीमध्ये २२ जण बाधित झाले आहेत. 

उस्मानाबाद कोरोना मीटर 
एकुण रुग्ण - ८०४२
बरे झालेले रुग्ण- ५७५६
उपचारावरील रुग्ण- २०५४
एकुण मृत्यु - २३२ 
आजचे बाधित - १९२
आजचे मृत्यु - ०६

loading image