esakal | Corona Breaking : उस्मानाबाद जिल्ह्यात आज २०६ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या २,४६८ वर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

नवीन २०६ जणांच्या वाढीनंतर रुग्णसंख्या दोन हजार ४६८ वर गेली आहे. कळंब ४९, तुळजापुर ४७, उस्मानाबाद ३७, परंडा २४, उमरगा १९, भुम १८, लोहारा ११ व वाशीमध्ये एक अशा २०६ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

Corona Breaking : उस्मानाबाद जिल्ह्यात आज २०६ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या २,४६८ वर 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी आलेल्या अहवालामध्ये २०६ जण कोरोनाबाधित झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामध्ये ५० जण अँटिजेन टेस्टमधुन पॉझिटिव्ह आले आहेत. तर १५६ जणाचे अहवाल टेस्टिंग सेंटर येथून आले आहेत. नवीन २०६ जणांच्या वाढीनंतर रुग्णसंख्या दोन हजार ४६८ वर गेली आहे. कळंब ४९, तुळजापुर ४७, उस्मानाबाद ३७, परंडा २४, उमरगा १९, भुम १८, लोहारा ११ व वाशीमध्ये एक अशा २०६ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

उस्मानाबाद शहरामध्ये विधाते हॉस्पीटल येथील दहा जण, खाजा नगर तीन, स्वप्नविहार कॉलनी एक, सेवालाल कॉलनी, तेरणा कॉलेज परिसर एक, जिल्हा रुग्णालय एक, स्टेशन रोड परिसर एक, दर्गा परिसर एक, तेरणा कॉलेज परिसर एक, समर्थ नगर एक, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय एक, बालाजी नगर एक, सेंट्रल बिल्डींग एक, सार्थक अपार्टमेंट एक, सांजा रोड तीन तर तालुक्यामध्ये तेर तीन, ढोकी एक, उपळा एक, काजळा तीन, गुजरवाडी एक आदी भागामध्ये रुग्ण सापडले आहेत.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

तुळजापुर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथील दहा, तहसिल कार्यालय एक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय १२, तालुक्यामध्ये काटी दहा, तुळजापुर खुर्द आठ, तामलवाडी दोन, देवसिगा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

उमरगा येथील अजय नगर पाच, भीम नगर दोन, समता नगर एक, सदन नगर एक, सोनार गल्ली दोन आदीसह तालुक्यामध्ये मुरुम दोन, कोरेगाववाडी दोन, जगदाळवाडी दोन आदी भागामध्ये नविन रुग्ण आढळले आहेत.
कळंब शहरामध्ये तीन,कसबा पेठ तीन, जिजाऊ नगर पाच,पापडे गल्ली दोन तर तालुक्यामध्ये सावरगाव पाच,  भाटशिरपुरा एक, कोथळा चार, खेर्डा एक, बोरगाव सात, कन्हेरवाडी एक,दहिफळ सात, खामसवाडी पाच, चोराखळी एक, मस्सा खंडेश्वरी दोन, पानगाव एक आदी गावामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

परंड्यामध्ये आंबेडकर चौक एक, नालसाब गल्ली चार, पल्ली गल्ली आठ, शहरात अजुन तीन, उपजिल्हा रुग्णालय एक, मंगळवार पेठ एक यासह तालुक्यातील शेलगाव दोन, बावचीवाडी एक, आलेश्वर दोन आदी भागामध्ये रुग्णसंख्या आढळुन आली आहे. लोहारा येथे आष्टा कासार तीन, कास्ती (बु) तीन, सास्तुर एक आदी गावामध्ये रुग्ण सापडले आहेत.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

भूम शहरामध्ये सात तर तालुक्यातील ईटमध्ये नऊ व आष्टी येथे दोन रुग्ण सापडले आहेत. वाशी शहरामध्ये एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या दोन हजार ४६८ इतकी झाली आहे. त्यामध्ये ८१६ लोक बरे होऊन घरी गेले आहेत तरी अजुनही १५९० लोकांवर उपचार सूरु आहेत. जिल्ह्यातील मृत्युचा आकडा ६४ वर गेला आहे.

संपादन-प्रताप अवचार 

loading image