SSC RESULT : उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचीच बाजी; ९४ टक्के लागला निकाल 

सयाजी शेळके 
Wednesday, 29 July 2020

जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ४३० शाळेतून नव्याने २२ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये २१ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यापैकी २० हजार ७०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.२५ टक्के आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४ टक्के लागला असून यंदा पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  
जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ४३० शाळेतून नव्याने २२ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये २१ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यापैकी २० हजार ७०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.२५ टक्के आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

यामध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्यांची संख्या सात हजार ९६९ एवढी आहे. तर प्रथम श्रेणीत सात हजार ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागात नांदेड नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचा निकालात दुसरा क्रमांक आहे. दरम्यान रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६७ टक्के आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

मुलींची सरशी
यंदा जिल्ह्यात ११ हजार ७७६ मुलांनी तर १० हजार ५४७ मुलींनी नोंदणी केली होती. यापैकी ११ हजार ५७९ मुलांनी परिक्षा दिली. यापैकी १० हजार ६६४ मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर १० हजार ३८९ मुलींनी परिक्षेला हजेरी लावली होती. यापैकी १० हजार ४० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच उत्तीर्णमध्ये किंचित मुलांची संख्या जास्त असली तरी उतीर्ण मुलींची टक्केवारी जास्त असून मुलांपेक्षा मुलीच सरस असल्याचे चित्र यंदाच्या दहावीच्या परिक्षेत दिसत आहे.
Edited by pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad District SSC Result 94 percentage