शिवबंधनाचा इफेक्ट; पालकमंत्री गडाख यांची गाडी धावते जोरात  

तानाजी जाधवर
Friday, 14 August 2020

शिवबंधन बांधताच पालकमंत्री शंकरराव गडाख अॅक्टीव्ह झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तीन दिवसापुर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गडाख यानी शिवसेनेचे शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला होता.

उस्मानाबाद : शिवबंधन बांधताच पालकमंत्री शंकरराव गडाख अॅक्टीव्ह झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तीन दिवसापुर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गडाख यानी शिवसेनेचे शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यानंतर तातडीने त्यांनी जिल्ह्यामध्ये मुक्कामी दौरा आयोजीत केला आहे. या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पोहचण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे. शिवबंधनाचा इफेक्ट जिल्ह्यासाठी चांगलाच उपयोगाचा ठरल्याची चर्चा आता सूरु झाली आहे.  

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

पालकमंत्री श्री. गडाख शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी वाशी तालुक्यातील कोरोना केअर सेंटमध्ये जाऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस केली. त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे. याची पाहणी करुन रुग्णांना धीर देण्याचे काम केले. या शिवाय पुढे ते कळंब, उमरगा, लोहारा आदी तालुक्यामध्ये गाठीभेटी देत आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्र्यानी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा मात्र चांगलीच कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या स्थितीमध्ये प्रशासनावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे वारंवार दिसुन येत होते. मात्र आता पालकमंत्री चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर देखील चांगलाच दबाव निर्माण झाल्याचे पाहयला मिळत आहे. या अगोदर पालकमंत्री श्री. गडाख जिल्ह्यामध्ये क्वचित येत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यावर त्यानी स्पष्टीकरण देऊन यापुढे असे होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचा प्रत्यय त्यानी कृतीमधुन दाखवुन देखील दिला आहे. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

विरोधकांनी पालकमंत्र्याविरोधात टिकेची झोड उडवून देत त्याना लक्ष्य केले होते. मात्र विरोधकांनाही त्यानी आता बोलायला जागा ठेवली नसल्याचे चित्र आहे. अपक्ष निवडून आलेल्या श्री. गडाख याना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. भाजपने आपल्या संपर्कात सत्तेतील काही लोक असल्याचे सांगितल्यानंतर शिवसेनेने श्री. गडाख याना शिवबंधन बांधले होते. शिवबंधन बांधल्यानंतर मात्र श्री. गडाख हे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसुन येत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: osamanabad guardian minister gadakh active