esakal | उस्मानाबाद ब्रेकिंग : परंड्यातील नरसाळे वस्तीला पाण्याचा वेढा, ९० लोक अडकले, बचावकार्य सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद पाऊस.jpg

ओढा आणि नदीच्या पाण्याचा  वेढा पडल्याने परंडा तालुक्यात नव्वद लोक अडकले आहेत.  दोन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उल्कानदीला पूर आला असून वडनेर ( ता. परंडा ) येथील नरसाळे वस्तीला नदी अन ओढ्याचा विळखा पडल्याने तब्बल ९० लोक अडकून पडले आहे.

उस्मानाबाद ब्रेकिंग : परंड्यातील नरसाळे वस्तीला पाण्याचा वेढा, ९० लोक अडकले, बचावकार्य सुरु

sakal_logo
By
आनंद खर्डेकर

परंडा ( उस्मानाबाद) :  ओढा आणि नदीच्या पाण्याचा  वेढा पडल्याने परंडा तालुक्यात नव्वद लोक अडकले आहेत.  दोन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उल्कानदीला पूर आला असून वडनेर ( ता. परंडा ) येथील नरसाळे वस्तीला नदी अन ओठ्याचा विळखा पडल्याने तब्बल ९० लोक अडकून पडले आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न बुधवार ( ता. १४ ) रात्रीपासून प्रशासनाने सुरु केले आहेत. पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर वस्तीवरील नागरिकांची सुटका होणार आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागील दोन दिवसापासून परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यापूर्वीच चांदणी, खासापूरी हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. चांदणी येथून येणारी नदी व उल्फा या दोन नदयाचा संगम देवगाव येथे होतो. त्यामुळे उल्कानदीला मोठया प्रमाणात पूर आला आहे. देवगाव व वडनेर या दोन गावाच्या मधूनही नदी वाहत आहे. या भागातील अनेक शेतकरी कुटुंब शेतातच वस्ती करून राहतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वडनेर गावच्या बाजूने नरसाळे वस्तीवर असेच काही कुटुंबे वस्ती करून आहेत.वस्तीच्या बाजूने येणाऱ्या ओढ्याने व उल्फानदीने वस्तीला पाण्याचा वेढा दिला असून वस्तीवरील लोक अडकून पडले आहेत. नदीचे पाणी उतरत्यानंतर नागरिकांची सुटका होणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून प्रशासन नागरिकांच्या सुटका करण्यासाठी कामाला लागले आहे.तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी ( ता. १५ ) सकाळी अकरा वाजेपर्यंत पाण्याचा जोर कमी होईल. त्यानंतर नागरिकांची सुखरूप सुटका करता येईल असे परिसरातील शेतकरी प्रताप पाटील यांनी सांगितले. पाण्याच्या वेढ्यात नरसाळे, पाटील, चौधरी अशी कुंटुबे आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तहसीलदार हेळकर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संपर्कात  आहेत. इलेक्ट्रॉनिक बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरज भासल्यास हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)