
जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ६०१ झाली. त्यामध्ये ३५५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या २१२ रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सूरु आहेत. जिल्ह्यातील मृत्युची संख्या तीनने वाढुन आता आकडा ३४ वर पोहचला आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रलंबित अहवाल रात्री उशीरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असुन त्यामध्ये १८ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा सहाने वाढला आहे.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून १९० स्वॅब नमुने तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. ते सर्व अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. यामध्ये १८ पॉझिटिव्ह तर १७२ निगेटिव्ह आले आहेत.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुका नऊ, उमरगा पाच, तुळजापूर दोन, कळंब दोन लोकांचा समावेश पॉझिटिव्ह आले आहेत. तर उस्मानाबाद तालुक्यातील दोघांचा व तुळजापुर शहरातील एकाचा अशा तिघांचा मृत्यु झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये २२ वर्षीय स्त्री, २६ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष हे सर्व कपालेश्वर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद येथील आहेत. ३५ वर्षीय पुरुष (एस टी कॉलनी उस्मानाबाद), २१ वर्षीय स्त्री अलीपूर रोड (बार्शी जि. सोलापूर) ३० वर्षीय पुरुष (खाजानगर उस्मानाबाद), २५ वर्षीय पुरुष (शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय) उस्मानाबाद.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
उमरगा तालुक्यातील एक वर्षीय मुलगा (डाळिंब ता. उमरगा) नऊ वर्षीय मुलगी (रा. पतंगे रोड उमरगा), ५६ वर्षीय, पुरुष (रा.बालाजी नगर उमरगा), ४० वर्षीय पुरुष (रा.आरोग्य नगर उमरगा.), ५७ वर्षीय स्त्री (रा. औरद गुंजोटी उमरगा), ७५ वर्षीय स्त्री (अणदूर ता. तुळजापूर), ६५ वर्षीय पुरुष (अजिंक्य कॉलनी तुळजापूर), ३३ वर्षीय पुरुष (रा. डिकसळ ता. कळंब), ३३ वर्षीय स्त्री (रा. डिकसळ ता. कळंब याचा समावेश आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
मृत्यूत यांचा समावेश
६५ वर्षीय पुरुष (रा. आचार्य गल्ली, उस्मानाबाद), ७० वर्षीय पुरुष (रा. टाकळी ता. उस्मानाबाद) व ८० वर्षीय महिला (रा. कदम वस्ती ता. तुळजापूर) जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ६०१ झाली. त्यामध्ये ३५५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या २१२ रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सूरु आहेत. जिल्ह्यातील मृत्युची संख्या तीनने वाढुन आता आकडा ३४ वर पोहचला आहे.
(संपादन- प्रताप अवचार)