Corona Update : उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू, आज बारा पॉझिटिव्हची भर.. 

तानाजी जाधवर
Sunday, 19 July 2020

जिल्ह्यातील १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. (ता.१८) रोजी रात्री उशिरा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथून १५० अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये १२ पॉझिटिव्ह आले आहेत. 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. (ता.१८) रोजी रात्री उशिरा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथून १५० अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये १२ पॉझिटिव्ह आले आहेत. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील नऊ जणाचा समावेश आहे. २५ वर्षीय महिला. रा. बार्शी नाका, उस्मानाबाद. ३० वर्षीय महिला रा. शाहू नगर, उस्मानाबाद. २५ वर्षीय पुरुष रा.धारासूर मर्दिनी मंदिराजवळ उस्मानाबाद. ३० वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, सांजा चौक, उस्मानाबाद. २४ वर्षीय पुरुष, रा. मुलांचे वसतिगृह, आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद. ३० वर्षीय पुरुष, रा. कौडगाव (बावी ),पोस्ट -खेड. ता. उस्मानाबाद. ५९ वर्षीय पुरुष  रा. पोहनेर ता. उस्मानाबाद.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

उमरगा तालुका एक जण पॉझिटिव्ह आला आहे. ४० वर्षीय पुरुष. रा. हमीद नगर, उमरगा. तुळजापूर तालुक्यातल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. ३० वर्षीय महिला रा. जळकोट ता. तुळजापूर. ४७ वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, तुळजापूर. आज एकूण १२ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

कोरोनाने दोघांचा मृत्यू 

कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असुन ५२ वर्षीय पुरुष. रा. आगड गल्ली हे उस्मानाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाले आहेत. ५० वर्षीय  पुरुष रा. उमरगा यांचा सोलापूर येथे उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५०८ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनाने २६ जणांचा बळी घेतला आहे.

( संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanbad corona Update two patient death 12 new corona positive