esakal | उस्मानाबादच्या डॉक्टरची दुबईत कामगिरी : एसएमएग्रस्त दोन बालकांना कोट्यावधीचे इंजेक्शन दिले मोफत.    
sakal

बोलून बातमी शोधा

शिरढोण.jpg

स्पायनल मस्कयुलर ट्रोफी (एसएमए) हा एक मुलांना होणारा गंभीर आणि आनुवंशिक आजार आहे. त्याच्या इजालासाठी जीन थेरेपीच द्यावी लागते. पण, त्यासाठी एका इंजेक्शनची किमत तब्बल १५ कोटी रुपये आहे. त्यामुळे हा इलाज सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. असे असताना यूएईमधील दोन बालकांना संबंधित कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण (ता. कळंब) येथील डॉ. विवेक बद्रीनारायण मुंदडा यांच्या पुढाकारातून हे इंजेक्शन मोफत दिले आहे. डॉ. मुंदडा सध्या बाल मेंदूरोगतज्ज्ञ म्हणून दुबईमध्ये कार्यरत आहेत. 

उस्मानाबादच्या डॉक्टरची दुबईत कामगिरी : एसएमएग्रस्त दोन बालकांना कोट्यावधीचे इंजेक्शन दिले मोफत.    

sakal_logo
By
जगदीश जोशी

शिराढोण (उस्मानाबाद) : स्पायनल मस्कयुलर ट्रोफी (एसएमए) हा एक मुलांना होणारा गंभीर आणि आनुवंशिक आजार आहे. त्याच्या इजालासाठी जीन थेरेपीच द्यावी लागते. पण, त्यासाठी एका इंजेक्शनची किमत तब्बल १५ कोटी रुपये आहे. त्यामुळे हा इलाज सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. असे असताना यूएईमधील दोन बालकांना संबंधित कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण (ता. कळंब) येथील डॉ. विवेक बद्रीनारायण मुंदडा यांच्या पुढाकारातून हे इंजेक्शन मोफत दिले आहे. डॉ. मुंदडा सध्या बाल मेंदूरोगतज्ज्ञ म्हणून दुबईमध्ये कार्यरत आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


एसएमए हा आजार झालेली मुलं बसूच शकत नाहीत. एवढेच नाही त्यांचे आयुष्य फारफार तर दोन वर्षांचे असते. पण, या मुलांना जीन थेरपीद्वारे सामान्य एसएमएन-१ जनुक इंजेक्शनमधून रक्तात दिल्यास त्यांच्या शरीर तयार होत नसलेले एसएमएन प्रथिन तयार होते. त्यामुळे जी मुले बसूही शकत नाहीत, ती चालू शकतात. तसेच या उपचारानंतर पीडित मुलांचे स्नायू बळकट होऊन अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात. अमेरिका, युरोप, जपानमध्ये हे उपचार तिथल्या सरकारने मान्यता दिल्याने उपलब्ध आहेत. परंतु, हे उपचार फार महागडे आहेत. मात्र, नोव्हार्टिस या औषध कंपनीने जगभरात या आजाराच्या औषधाचे १०० मोफत डोस देण्याची योजना सुरू केली. त्या अंतर्गत या कंपनीशी संपर्क साधून डॉ. मुंदडा यांनी दुबईतील दोन बालकांना हे महागडे इंजेक्शन मोफत मिळवून दिले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


जीन थेरपी देणारे डॉ. विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर! 
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण (ता.कळंब) येथील डॉ. विवेक बद्रिनारायण मुंदडा हे बाल मेंदूरोगतज्ज्ञ म्हणून मेडकेयर वूमन अँड चिल्ड्रेन (दुबई) येथे कार्यरत आहेत. त्यांच्या देखरेखी खाली दोन एसएमए "स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी" रुग्णांना या अभिनव जीन थेरपीचा नुकताच लाभ देण्य़ात आला. गुरुवारी (ता.बारा) या दोन्ही बालकांना ही जीन थेरपी देण्यात आली. या यशानंतर या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ. विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले डॉक्टर ठरले असून हे दोन्ही रुग्ण मॅप map या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेणारे संपूर्ण आखाती देशामध्ये पहिले रुग्ण आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image