esakal | आजी-नातीने केली कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

file photo

उमरगा तालुक्यातील बेडगा येथील ज्येष्ठ महिला व तिच्या नातीला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र चौदा दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी शहरातील स्वतःच्या घरी राहण्यासाठी समाजाच्या नकारात्मक मानसिकतेला सामोरे जावे लागले.

आजी-नातीने केली कोरोनावर मात
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तालुक्यातील बेडगा येथील ज्येष्ठ महिला व तिच्या नातीला शुक्रवारी (ता. पाच) डिस्चार्ज देण्यात आला. मात्र चौदा दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी शहरातील स्वतःच्या घरी राहण्यासाठी समाजाच्या नकारात्मक मानसिकतेला सामोरे जावे लागले.

उपचारानंतरही होणारा मानसिक ताण कितपत योग्य आहे, याबाबत चर्चा होत आहे. शेवटी प्रशासनाने त्या कुटुंबाला धैर्य देत शहरातील स्वतःच्या घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे होणारा नाहक वाद मिटला. रविवारी (ता. सात) याच कुटुंबातील एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला. 
बेडगा येथील एक कुटुंब मुंबईच्या कांदिवली भागात वास्तव्यास होते.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

कोरोनाच्या विळख्यामुळे ते गावाकडे परतले. दुर्दैवाने या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली. कांदिवली भागात ऑटोरिक्षा चालवून मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाला उभारी दिली. त्यात साठवर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाच्या आजाराने सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पत्नी, मुलगा व नातीलाही कोरोनाने घेरले. एका मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. पतीच्या मृत्यूच्या विरहाने दु:खी झालेल्या ज्येष्ठ महिलेला आणि सातवर्षीय नातीला शुक्रवारी डिस्चार्च देण्यात आला. या कुटुंबाचे अंतुबळी सांस्कृतिक सभागृहाच्या पाठीमागे स्वतःचे घर आहे.

उपचारानंतर बरे होऊन ते बेडगा येथे मूळ गावी जाण्यापेक्षा शहरातील घरात राहण्याचा निश्‍चय केला. परंतु शेजाऱ्यांनी येथे राहण्यापेक्षा मूळ गावी राहण्याबाबतची चर्चा करून अप्रत्यक्ष विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. रुग्णालयाने अॅम्ब्युलन्समधून आजी-नातीला व पूर्वीच निगेटिव्ह आलेल्या एका मुलाला घरी सोडले. पोलिस अधिकारी व पोलिस बांधवांनी त्यांच्या घराकडे गस्त मारली आणि होणारा अप्रत्यक्ष विरोध निवळला. दरम्यान, सातवर्षीय मुलगी व आजी कोरोनावर मात करून घरी परतली आहे. रविवारी याच कुटुंबातील एका मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

अकरा वर्षीय मुलावर उपचार सुरू 
शहरातील कोविड रुग्णालयात २१ मेपासून दाखल झालेल्या तेरापैकी अकरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रविवारी एकाला डिस्चार्ज देण्यात आल्याने आता केसरजवळगा येथील एका अकरा वर्षीय मुलावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना दहाव्या दिवशी डिस्चार्ज दिला जातोय. स्वॅब घेतल्याच्या दिवसापासून दिवस गृहीत धरले जातात.

रुग्णालयात प्रत्यक्षात पाच दिवस औषधोपचार करण्यात येतात. रुग्णांना घरी पाठवताना स्वॅब घेतला जात नाही. मात्र चौदा दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.