गहू, आंब्याला अवकाळी पावसाचा फटका

पिंपरी (शिराढोण, ता. कळंब) : अवकाळी पावसामुळे काकडीच्या पिकात साचलेले पाणी.
पिंपरी (शिराढोण, ता. कळंब) : अवकाळी पावसामुळे काकडीच्या पिकात साचलेले पाणी.

शिराढोण (जि. उस्मानाबाद) : परिसरात रविवारी (ता. १९) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शेतात काढून ठेवलेला ज्वारीचा कडबा, गहू, भाजीपाल्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी विजेचे खांब तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शिराढोण महसूल मंडळात ३५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

शिराढोणसह परिसरातील गावांत रविवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. पिंपरी (शिराढोण, ता. कळंब) येथील जवळपास ३० शेतकऱ्यांचे ५० हेक्टरवरील पपई, टरबूज, टोमॅटो, भाजीपाला, काकडी, मिरची या पिकांचे गारपिटीने नुकसान झाले. पिंपरी (शिराढोण) येथील शेतकरी बालाजी पाडे यांच्या ७० आर जमिनीवरील, रवींद्र पाडे यांच्या ७० आर, एकनाथ रोकडे यांच्या एक हेक्टर २० आर, लक्ष्मीबाई रोकडे यांच्या एक हेक्टर, सिद्धू पाडे यांच्या ८० आर, तर नामदेव पुदाले यांच्या एक हेक्टरमधील पपईचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. रवींद्र पाडे व बब्रुवान पाडे यांच्या साडेतीन हेक्टरमधील पेरूचे नुकसान झाले. ज्ञानोबा पुदाले यांचे काकडी, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मागील महिन्यात १८ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यानंतर लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १८ मार्च रोजी झालेल्या पावसाने २१ हजार ७४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. लॉकडाउनमुळे त्यावेळच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, रब्बीचा पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

वीजपुरवठ्यावर परिणाम 
दरम्यान, रविवारी रात्री अवकाळी पावसाला सुरवात झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला. तो सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्ववत झाला. वीज नसल्यामुळे नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. सोमवारी तलाठी संभाजी पवार यांनी पिंपरी (शि.) गावाला भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. 
--------------------- 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com