अर्ध्या जिल्ह्यात धुवाधार पाऊस, अर्ध्या भागात प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, उमरगा तालुक्यांतील काही भागात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर अर्ध्या जिल्ह्यातील भागात पावसाने हुलकावणी दिली.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब, उमरगा तालुक्यांतील काही गावांत शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर अर्ध्या जिल्ह्यातील भागात पावसाने हुलकावणी दिली. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

शिराढोण परिसरात धुवाधार पाऊस 
कळंब तालुक्यातील शिराढोणसह परिसरातील नागूलगाव, हासेगाव, एकुरगा, वाठवडा, निपाणी येथेही शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच ते सव्वासहापर्यंत जोरदार पाऊस झाला. सुमारे दीडतास सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे ओढे, नाले वाहते झाले; मात्र पेरणी झालेल्या शेतात पाणी साचल्याने कोवळी रोपे सडून मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आज झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या पिकाला कोठे फायदा, तर बहुतांश ठिकाणी फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तसेच ऊसपीकवाढीसाठी पावसाचा फायदा होणार आहे. दरम्यान, या पावसामुळे विहिरी, तलाव, ओढ्यातील पाणीपातळी वाढणार आहे.ाऊस झाला. खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना चांगला फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.

पाथरूड, आंभी, जांब-बावी परिसरात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी व मृग नक्षत्रातील दमदार पावसामुळे खरीप पेरणी झाली आहे. अनेक वर्षांनंतर यंदा मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीस पेरण्या झाल्या आहेत. पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, मूग, मका, बाजरी, हुलगा, सूर्यफूल सर्वच पिकांची उगवण क्षमता चांगली झालेली असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होऊ लागले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी राहिलेल्या पेरण्या उरकून घेतल्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गेल्या चार-पाच दिवसांपासून ऊन पडत असल्यामुळे उकाडा जाणवत होता. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये उष्णता असल्याने उकाडा जाणवत होता. दुपारी पावणेदोनच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाथरूड, जांब, बावी, नान्नजवाडी, दुधोडी, बागलवाडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, सावरगाव, बेदरवाडी, जयवंतनगर, पाटसांगवी, राळेसांगवी परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना तो फायद्याचा ठरला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

त्रिकोळी शिवारात पावसाची रिपरिप 
उमरगा : संपूर्ण तालुका पावसाच्या प्रतीक्षेत असताना शनिवारी (ता. २७) दुपारी चारच्या सुमारास काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, मुळज शिवारात वीज कोसळून एक गाय दगावली. 
खरीप हंगामातील पेरण्या पावसाअभावी रखडल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांनी हलक्या पावसावर पेरण्या आटोपल्या. मात्र यंदा सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून आल्याने शेतकरी हतबल झाला.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास उमरगा शहरासह परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र केवळ त्रिकोळी शिवारातील गुगळगाव, गुगळगाववाडीसह मुळज शिवारातील काही भागांत मध्यम पाऊस झाला. मुळज शिवारातील गोविंद दुधभाते यांची गाय वीज कोसळून दगावली.

पाथरूड परिसरात जोरदार पाऊस 
पाथरूड : परिसरात शनिवारी (ता. २७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह एक तास जोरदार पाऊस झाला. खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना चांगला फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. पाथरूड, आंभी, जांब-बावी परिसरात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी व मृग नक्षत्रातील दमदार पावसामुळे खरीप पेरणी झाली आहे. अनेक वर्षांनंतर यंदा मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीस पेरण्या झाल्या आहेत.

पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, मूग, मका, बाजरी, हुलगा, सूर्यफूल सर्वच पिकांची उगवण क्षमता चांगली झालेली असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होऊ लागले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी राहिलेल्या पेरण्या उरकून घेतल्या. गेल्या चार-पाच दिवसांपासून ऊन पडत असल्यामुळे उकाडा जाणवत होता. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये उष्णता असल्याने उकाडा जाणवत होता.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाथरूड, जांब, बावी, नान्नजवाडी, दुधोडी, बागलवाडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, सावरगाव, बेदरवाडी, जयवंतनगर, पाटसांगवी, राळेसांगवी परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना तो फायद्याचा ठरला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about rain