उमरग्यातील ऐंशीपैकी ४२ गावांत महिलांना सरपंचपदाची संधी, आरक्षणामुळे प्रस्थापितांचे स्वप्न भंगले !

अविनाश काळे
Friday, 22 January 2021

मुळज, बलसूर व तुरोरीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उमरगा(जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२२) पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार विलास तरंगे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान अनुसूचित जातीसाठी १३, अनुसूचित जमातीसाठी दोन, नागरिकांच्या इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी २२ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४३ गावासाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे.

नुकत्याच झालेल्या ४९ ग्रामपंचायतीतील गुंजोटीचे सरपंचपद ओबीसी महिला, दाळींब ओबीसी पुरुष, कवठा अनुसूचित जाती पुरुषासाठी राखीव झाले आहे. मुळज, बलसूर व तुरोरीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०२२ पर्यंत होणाऱ्या २२ ग्रामपंचायतींच्या एका टप्प्यात तर सात व दोन ग्रामपंचायतींच्या दोन टप्प्यात निवडणुका होणार असल्याने सर्वच ऐंशी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बालक ज्ञानेश्वर सगर यांच्या हस्ते काढण्यात आले.

अनुसूचित जातीच्या तेरा आरक्षणात सहा पुरूष, सात स्त्री. अनुसूचित जमातीच्या दोनपैकी एक पुरुष व एक स्त्री. नागरिकांच्या इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या २२ पैकी पुरुषासाठी अकरा तर स्त्रीसाठी अकरा सरपंचपद आरक्षित झाले.  सर्वसाधारण गटाच्या ४३ सरपंचपदापैकी २० पुरुषासाठी तर २३ ठिकाणी स्त्रियांना सरपंचपदाची संधी आहे.

४२ गावांत महिलांना सरपंचपदाची संधी
तालुक्यातील ऐंशीपैकी ४२ गावात महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ४९ गावाच्या निवडणुकीनंतर गावकारभाऱ्यांना आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. २४ महिला तर २५ पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

डिग्गीची सरपंचपदाची जागा रिक्त रहाणार!
डिग्गीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाले आहे मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या आरक्षणाची महिला उमेदवार मिळू शकली नसल्याने जागा रिक्त राहिली. आता सहा महिन्याने निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर गावाला सरपंचपद मिळेल.

असे आहे सरपंचपदाचे गावनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती (पुरुष) -धाकटीवाडी, एकोंडी (जहागीर), कलदेवनिंबाळा, कवठा, काळनिंबाळा, भिकारसांगवी. अनुसूचित जाती (स्त्री) - मुरळी, आनंदनगर, जवळगाबेट, भुसणी, सावळसुर, कोथळी, कोरेगाव.
अनुसूचित जमाती (पुरुष) - भगतवाडी, अनुसूचित जमाती (स्त्री) - डिग्गी. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग (पुरुष) - कराळी, नारंगवाडी, दाळिंब, हंद्राळ, दावलमलिकवाडी, अंबरनगर, बाबळसूर, नाईचाकूर,  कोरेगाववाडी, आष्टा (जहागीर) मातोळा. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - गुंजोटी, चिंचकोटा, कोराळ, वरनाळवाडी, सूंदरवाडी, त्रिकोळी, चिंचोली (भुयार,) चिंचोली (जहागीर), महालिंगरायवाडी, कदमापूर, दाबका. सर्वसाधारण (पुरुष) - एकूरगा, तुंगाव, औराद, खसगी, कदेर, गुरुवाडी, गुगळगाव, व्हंताळ, नाईकनगर (सुंदरवाडी), कोळसुर (गुंजोटी) कडदोरा, येळी, मळगीवाडी, सुमुद्राळ, जगडाळवाडी, पळसगाव, हिप्परगाराव, नाईकनगर (मुरूम), थोरलीवाडी, जकेकुर. सर्वसाधारण (स्त्री) - येणेगुर, कोळसुर (कल्याण), सूपतगाव, गणेशनगर, केसरजवळगा, नागराळ (गुंजोटी), बोरी, आलूर, माडज, मळगी, मुळज, तुरोरी, बेडगा, तलमोड, पेठसांगवी, बेळंब, कंटेकुर, बलसुर,  दगडधानोरा, वागदरी, कुन्हाळी, जकेकुरवाडी, रामपूर.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News Forty Two Villages To Be Women Sarpanch Umarga