अखेर कोल्हापूर-धनबाद रेल्वे धावली उस्मानाबादमार्गे, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

Osmanabad News
Osmanabad News
Updated on: 

उस्मानाबाद : कोल्हापूर- पारसनाथ- धनबाद या रेल्वेची उस्मानाबाद मार्गे पहिली फेरी शुक्रवार (ता. १९) पासून सुरु झाली. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर सकल जैन समाजाच्यावतीने या रेल्वेचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेला पुष्पहार घालून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या रेल्वेमुळे जैन धर्माचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजीला जाण्याची सोय झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जैन धर्मीयांचे एक सिद्धक्षेत्र कुंथलगिरी, धाराशिव जैन लेणी, तेर, कासार आष्टा, काटी सावरगाव, नाईचाकूर असल्यामुळे उत्तर भारतीय जैन भाविकांची सुद्धा आता सोय झाली आहे.

एकूणच या रेल्वेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनाला वेग येऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे नावलौकिक वाढेल, असा विश्वास यावेळी जैनबांधवानी व्यक्त केला. यावेळी सकल जैन समाज अध्यक्ष उल्हास चाकवते, सचिव अतुल अजमेरा, सुदेश फडकुले, राहुल दुरुगकर, अतुल कांबळे, प्रशांत येणेगूरे, अक्षय गांधी, बाहुबली नवले, सुनील वायकर, मनोज चाकवते, पप्पूशेठ पांडे, मिलिंद एखंडे यांची उपस्थिती होती.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com