Manoj Jarange : पस्तीस लाख नोंदीवर पावणेदोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणारच; मनोज जरांगे-पाटील यांचा विश्वास

२४ डिसेंबरला आरक्षणाचा कायदा होणार; निलंगा येथील जाहीर सभेला अलोट गर्दी
Manoj Jarange
Manoj Jarange esakal

निलंगा : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेले आंदोलन ८० टक्के यशस्वी झाले असून ३५ लाख कुणबी नोंदीवरून पावणेदोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहेच येत्या २४ डिसेंबरला ऐतिहासिक कायदा पारीत होईल असा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी निलंगा येथील जाहीर सभेत शनिवारी ता. ९ रोजी व्यक्त केला. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समाजाशी दगाफटका करून वेळ मारून नेलात तर पुढची वेळ तुम्हाला जड जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Manoj Jarange
Bone Health Tips :  म्हातारपणी हाडं खिळखिळी व्हावला नको असतील, तर हे पदार्थ खाणं आजचं बंद करा!

मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या जनरेट्यापुढे सरकारने पूर्ण हात टेकले आहेत. स्वातंत्र्याच्या अगोदरच आरक्षण होते सत्तर वर्ष का? दिले नाही असा सवाल त्यांनी केला. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाची झालेली एकजुट कांही लोकांच्या मनात खुपत आहे. मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ नये, त्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही असा त्यांचा डाव असून म्हणूनच गैरसमज पसरावून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कांही राजकीय मंडळी करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला.

Manoj Jarange
Hair Care Tips : दिवसभरात तुमची हेअरस्टाईल बिघडून जातेय? मग, ‘या’ टीप्स करा फॉलो

सर्व समाज आरक्षण मिळावे म्हणून पाठीशी आहे. एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते बघतोच असेही त्यांनी भुजबळ यांच्यावर रोख व्यक्त केला. आरक्षण नाही मिळाल्यास पुढची दिशा काय यासाठी १७ डिसेंबर रोजी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विराट जनसमुदाय सभेला उपस्थित होता.

छगन भुजबळनी माझा धसका घेतलाय, सध्या झोपेतही बरळतात....

माझी भाषा मराठवाड्याची आहे त्यांना नाही समजणार आरक्षण मिळू द्यायचा नाही हा त्यांचा डाव आहे तुम्ही सध्या मंत्री आहात संविधानाची शपथ घेतली मंत्री पदाचा गैरवापर करू नका मी रोज काय बोलतो आज काय बोलला, आज काय बोलला याचा धसका घेतला असून सध्या तो झोपेतही बरळतोय आभाळ आलं की त्यांच डोकं फिरल्यावनी होतय...अशी खिल्लीही मंत्री छगन भुजबळ यांची नाव न घेता उडवली. एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते नंतर बघणारच आहे असे अव्हाणही यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com