esakal | 'यंदा भगवान भक्तीगड घरीच न्या', पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

000pankaja munde.jpg

भगवान भक्तीगडावरील मेळावा यंदा ऑनलाईन - पंकजा मुंडे यांची माहिती  

'यंदा भगवान भक्तीगड घरीच न्या', पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना महामारीच्या संकटामुळे राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी साजरा होणारा दसरा मेळावा यंदा रविवारी (ता.२५) ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. ‘यंदा भगवान भक्तीगड घरीच न्या’, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी अनेक वर्षे भगवानगडावर दसरा मेळावा घेतला. दिवंगत मुंडेंच्या पश्चात गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय मेळाव्यांना विरोध केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. त्यानंतर राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे स्मारक उभारुन भगवान भक्तीगड असे नामकरण करुन मेळाव्याची परंपरा सुरु केली. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मेळावा होणार नाही. मात्र, पंकजा मुंडे दस-याला भगवान भक्तीगडावर जाऊन दर्शन घेतील. तसेच तेथून त्या ऑनलाईन मार्गदर्शन करतील. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दसऱ्याची ही परंपरा चालूच राहील. मात्र, यंदापुरते भगवान भक्ती गडावर न येता आपापल्या गावी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघनाची एक वेगळी परंपरा करू, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावामध्ये घेऊन जा. बाबांचे पूजन करा आणि त्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करेल असेही त्या म्हणाल्या. दसऱ्याला काय कार्यक्रम घ्यायचे, याचे वेळापत्र त्या सोशल मिडीयावरुन कळविणार आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)