बीडला मिळालंय गुंडांचं बळ वाढवणारं पालकत्त्व : पंकजाताईंचा धनुभाऊंवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे होमपिच असलेल्या परळीत सोमवारी अमर देशमुख या सराफा व्यापाऱ्याला रॉड व काठीने मारहाण करण्यात आली.

बीड : परळीतील सराफा व्यापाऱ्याला सोमवारी रात्री मारहाण झाल्यानंतर गुन्हाही नोंद झाला आहे. मंगळवारी परळीत काही काळ बंद पाळण्यात आला. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी, माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण आहे. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव असल्याची टिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ट्विटरवरुन केली आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे होमपिच असलेल्या परळीत सोमवारी अमर देशमुख या सराफा व्यापाऱ्याला रॉड व काठीने मारहाण करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी अमर देशमुख यांच्या फिर्यादीवरुनन गणेश कराडसह शाम कराड, लालु कराड, मंचक गिते आदींवर जीवे मारण्याचा प्रयत्न यासह इतर कलमांन्वये गुन्हे नोंद हेाऊन आरोपींना अटकही करण्यात आली.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

दरम्यान, व्यापाऱ्याला मारहाण करणारे राष्ट्रवादी आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपने होता. यानंतर परळीतील सर्वच नागरिक आणि व्यापारी आपले निकटवर्तीय आहेत, त्यामुळे कोणी जवळचा आणि कोणी लांबचा असा प्रश्न नाही. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, वैयक्तीक भांडणात आपले नाव घेऊ नये असा निर्वाळा धनंजय मुंडे यांनी दिला होता. त्यावरही पंकजा मुंडे यांनी ‘पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण आहे’ असा निशाणा साधला आहे.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

मारहाण करणारा आरोपी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली आहे, सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे, अशी टिका पंकजा मुंडे यांनी केली.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Attacked On Dhananjay Munde Parali Beed News