परळीत अल्पवयीन मुलीला फुस लाऊन केला अत्याचार

प्रा. प्रविण फुटके
Thursday, 9 July 2020

शहरातील एका महिलेचे अपहरण करुन १४ दिवस डांबून ठेवत अत्याचार केल्याची घटना समोर येऊन दोन दिवस उलटत नाही. तोच एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (ता. नऊ) समोर आल्याने शहरात खळबळ उडाली. परळी वैजनाथ येथे महिलांवर अत्याच्याराच्या घटना वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

परळी वैजनाथ (बीड) : शहरातील एका महिलेचे अपहरण करुन १४ दिवस डांबून ठेवत अत्याचार केल्याची घटना समोर येऊन दोन दिवस उलटत नाही. तोच एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (ता. नऊ) समोर आल्याने शहरात खळबळ उडाली. परळी वैजनाथ येथे महिलांवर अत्याच्याराच्या घटना वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

येथील बरकत नगर भागातील रहिवाशी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या राहत्या घरून फूस लावून गुरुवारी (ता. दोन) दुपारी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले. तीला परभणी, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला असल्याची फिर्याद पीडीतेने दिल्यावरुन येथील संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मुलीच्या घरच्यांनी गुरुवारी (ता. दोन) येथील संभाजी नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती.  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

तपास करताना संभाजीनगर पोलीसांना परभणी येथे ही मुलगी असल्याची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता ही मुलगी सापडली. मुलीची चौकशी केली असता तिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मुलीस पळवून नेणाऱ्या एक महिलेसह पुरुषास ताब्यात घेतले असून आरोपी नासिर पाशा पठाण, त्याची पत्नी आरशा नासिर पठाण दोघांनी संगनमत करून अपहरण केले. व सातत्याने बलात्कार केला. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

या दोन आरोपी विरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपास संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके हे करीत आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी एका महिलेचे अपहरण करुन तिला १४ दिवस डांबून ठेवून अत्याचार केल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी समोर आली हेाती. त्यात पुन्हा या घटनेची भर पडली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संपादन : प्रताप अवचार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parali city Rape of a minor girl