esakal | परळीत कोरोना संसर्गाचे मीटर शंभरीपार; एवढ्यांनी केली कोरोनावर मात.. 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली. या बँकेत १ हजार पाचशेच्या वर ग्राहकांनी या कालावधीत व्यवहार केल्याने या सर्व ग्राहकांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 

परळीत कोरोना संसर्गाचे मीटर शंभरीपार; एवढ्यांनी केली कोरोनावर मात.. 

sakal_logo
By
प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ ( बीड) : येथील कोरोना विषाणूच्या संसर्गाने शंभरी गाठली असून कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणही चांगले असून ३८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. ६२ रुग्णांवर आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

तालूका व शहरातील सर्वात जास्त ग्राहक असलेल्या इंडिया बँकेत ४ जुलैला कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. एकदाच बँकेतील पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली. या बँकेत १ हजार पाचशेच्या वर ग्राहकांनी या कालावधीत व्यवहार केल्याने या सर्व ग्राहकांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यामुळे शहर व तालुक्यात सुरू झालेले कोरोना मिटरने आजपर्यंत शंभरीपार केली आहे. ४ जुलैला सुरू झालेले कोरोना मिटर दररोज ५-६ ने वाढत आहे. ते अद्यापही सुरुच आहे. ते काही थांबण्यास तयार नाही. इंडिया बँकेतून सुरु झालेली कोरोनाची साखळी आरोग्य विभागाला आजपर्यंत तुटलेली नाही. दरम्यान शहर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आकडा शंभरीपार पोहचला असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शंभर पैकी ३८ जणांनी कोरोनावर मात केली असून ६२ रुग्णांवर आंबेजोगाई येथील कोविड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहरातील कोरोना मिटर थांबवण्यासाठी आरोग्य विभाग व महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासनाने दक्ष राहून नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच ज्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा भागात रँपीड टेस्ट करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहर व तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, खरेदी करत असताना शारीरिक अंतर पाळून, गर्दी करणे टाळावे, वेळोवेळी हात धुवून सँनेटायझरचा वापर करावा असे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुरमे यांनी सांगितले आहे.

(संपादन- प्रताप अवचार)