esakal | CORONA : परळीत कोरोना मीटर जोरात; कोरोनामुक्तचे प्रमाणही वाढले  
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

कोरोना मिटर आजपर्यंत कायम असून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १६८ वर जाऊन पोहचली आहे. तसेच कोरोना मुक्त रुग्ण होण्याचे प्रमाण ही चांगले असून ६९ रुग्णांना शुक्रवार (ता.३१) पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. १०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

CORONA : परळीत कोरोना मीटर जोरात; कोरोनामुक्तचे प्रमाणही वाढले  

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : शहरातील सर्वात जास्त ग्राहक संख्या असलेल्या राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकातील इंडीया बँकेतून सुरू झालेले कोरोना मिटर आजपर्यंत कायम असून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १६८ वर जाऊन पोहचली आहे. तसेच कोरोना मुक्त रुग्ण होण्याचे प्रमाण ही चांगले असून ६९ रुग्णांना शुक्रवार (ता.३१) पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. १०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

शहरातील इंडिया बँकेने कोरोना संसर्गाचे खाते ४ जुलैला उघडले. ते अद्याप पर्यंत बंद झालेले नाही. ४ जुलै पासून शुक्रवार (ता.३१) पर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या १६८ वर जाऊन पोहचली आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचे लोन पोहचले असल्याने कोरोनाची साखळी काही तुटण्यास तयार नाही. शहरातील नागरिकांनी कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनास मदत करणे आवश्यक आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

नगरपालिका, पोलीस, महसूल प्रशासनाने वाढत चाललेली कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण जे कंटोन्मेट झोन तयार केले आहेत. त्यामागील नागरिकांनी परिसरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा संपर्क होणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांचा संपर्क आलेला आहे. त्यांनी स्वतः हून प्रशासनाला माहिती सांगितली पाहिजे. तसेच संपर्कातील नागरिकांनी क्वारंटाईन व्हावे. प्रशासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहर व तालुक्यातील कोरोना मीटर थांबणार नाही. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

दरम्यान शहरात जरी कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. इंडिया बँकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील कोरोना रुग्णही कोरोनावर मात करत आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

शहर व तालुक्यातील ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृध्द व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन केल्या शिवाय कोरोनाचे मीटर थांबणार नाही.
Edited By Pratap Awachar