परभणीत दोन हजाराची लाच घेणारा वनपाल अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

परभणीः कारवाईत जप्त केलेले लाकूड परत करण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या वनपालासह मजूरास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.17) येलदरी कॅम्प येथे अटक केली.

परभणीः कारवाईत जप्त केलेले लाकूड परत करण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या वनपालासह मजूरास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.17) येलदरी कॅम्प येथे अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदाराने या संदर्भात परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून येलदरी कॅम्प येथे सापळा लावण्यात आला होता. ता.15 जुलै रोजी वनपाल धनंजय मुळे यांनी तक्रारदाराचे जप्त केलेले लाकूड परत करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली होती. लाचेची रक्कम सोमवारी (ता.17) वन परिमंडळातील मजूर अंकुश नरसिंग जाधव यांच्याकडे देण्याचे ठरले. त्यावरून हा सापळा लावण्यात आला. या सापळ्यात वन मजूर अंकुश जाधव याला दोन हजार रुपयांची लाचेची रक्कम घेतांना रंगेहात पकडण्यात आले.

या दोन्ही आरोपीविरुध्द सेनगाव (जि.हिंगोली) येथील पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक नारायणराव बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनकर गावंडे, पोलिस हवालदार लक्ष्मण मुरकुटे, पोलिस नाईक अनिल कटारे, पोलिस शिपाई अविनाश पवार, शिवाजी बोंडले, माणिक चट्टे, पोलिस नाईक भालचंद्र बाके, रमेश चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news bribery forester arrested