परभणीत नवरदेवाने केला रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नवरदेवाच्या या भूमिकेमुळे सोबतचे वऱ्हाडी अचंबित झाले. परंतु नवरदेवाने आंदोलनात सहभाग घेऊन संपाला पाठिंबा दिला. तिकडे मुलीकडून मंडळीसह पुढे गेलेली वऱ्हाडी नवरेदवाची वाट पाहत होते.

परभणी : शेतकरी संपादरम्यान सोमवारी पूर्णा तालुक्यातील लिमला येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनात चक्क नवरदेवाने सहभाग घेऊन संपाला पाठिंबा दिला.

परभणीपासून काही अंतरावर असलेल्या लिमला (ता. पूर्णा) येथील जिल्हा मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. याच दरम्यान पोखर्णी (ता. परभणी) येथील वऱ्हाडी मंडळी खडाळा (ता. पूर्णा) येथे विवाहासाठी जात होते. त्यात रवी बेले या नवरदेवाचाही समावेश होता. नवरदेवाची गाडी आंदोलनस्थळी आली असता आंदोलकर्त्यांनी या गाडीला वाट दिली, परंतु अचानक नवरदेवाने गाडी थांबविण्यास सांगून रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला.

अंगाला लावलेली हळद, डोक्याला बांधलेले बाशिंग अशा वेशात नवरेदाव आंदोलनात सहभागी झाला. नवरदेवाच्या या भूमिकेमुळे सोबतचे वऱ्हाडी अचंबित झाले. परंतु नवरदेवाने आंदोलनात सहभाग घेऊन संपाला पाठिंबा दिला. तिकडे मुलीकडून मंडळीसह पुढे गेलेली वऱ्हाडी नवरेदवाची वाट पाहत होते. अखेर लिमला ग्रामस्थांनी नवरदेवास खडाळा येथे रवाना केले. गावातील भीमराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शिंदे, काशीनाथ शिंदे, अंकुश शिंदे, विठ्ठल शिंदे, राजू सूर्यवंशी, विष्णू शिंदे आदी उपस्थित होते.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्या   

मुंबईकरांपुढे आजही 'दूधबाणी' कायम
शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यास सुरुवात
मुंबई बाजारात भाज्यांची आवक घटली
दलित व्यक्तीशी विवाह केल्याने गर्भवती महिलेला जिवंत जाळले
अशी चालते गतिमान एक्सप्रेस; अन्य मार्गांवरही धावणार
एक पाऊल स्वच्छतेकडे...!
‘भंडाऱ्या’च्या धानपट्ट्यात फळबागांतून प्रयोगशीलता
उसात विराट काबुली हरभऱ्याचा यशस्वी प्रयोग
सोलापूरमधील आठवडी बाजार सुरळीत

औरंगाबादमध्ये अकरावीचे प्रवेश यंदा प्रथमच ऑनलाइन

Web Title: parbhani news farmers strike bridegroom stops to participate