परळीसह पंधरा गावाचा पाणी प्रश्‍न सुटला; वाण धरण तुडुंब !

प्रा. प्रविण फुटके
Wednesday, 23 September 2020

शहर व तालुक्यातील पंधरा गावासाठी नागापूर येथे वाण नदीच्या पात्रात धरण बांधण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे लहान मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. मागच्या वर्षी परतीच्या पावसामुळे वाण धरण ४० टक्के भरल्याने परळीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता.

परळी वैजनाथ (बीड) : शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील नागापूरचे वाण धरण बुधवारी (ता.२३) पहाटे तब्बल चार वर्षांनंतर ओसंडून वाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहर व तालुक्यातील पंधरा गावासाठी नागापूर येथे वाण नदीच्या पात्रात धरण बांधण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे लहान मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. मागच्या वर्षी परतीच्या पावसामुळे वाण धरण ४० टक्के भरल्याने परळीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. यंदा मात्र मान्सूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने वाण धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. बुधवारी (ता.२३) पहाटे वाण धरण तुडुंब भरले असून चादरीवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. २०१६ मध्ये पडलेल्या पावसानंतर आज चार वर्षानंतर वाण धरण भरले आहे. धरण भरल्यानंतर शहरासह परिसरातील नागरिक व शेतकरी आनंदी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरिकांनी केले जलपूजन 
परळीकरांचे तहान भागवणारे नागापूर येथील वाण धरणाचे जल पूजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे,जेष्ठ नेते भीमराव दादा मुंडे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, पुंडलीकराव सोळंके, श्रीमंतराव सोळंके, रवी कांदे, किशोर केंद्रे, संतोष सोळंके, स्वामी अप्पा, उपसरपंच नागपूर शिवराज मुंडे, राजेश आघाव दौनापूर, कृष्णा मुंडे डाबी, अरुण पाठक, योगेश पांडकर, बाळू फड, सुरेश सातभाई, दीपक नागरगोजे, महेश बिडगर, अजय गोरे, उमेश बिडगर, विजय माने, अंकुश मुंडे डाबी व भारतीय जनता युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parli and fifteen villages water problem solve Wan Dam Full