बीडच्या पालकमंत्र्यांना अतिवृष्टी पावली, मतदार संघात नुकसानच नाही

bid 14.jpg
bid 14.jpg

बीड : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असून यात पालकमंत्र्यांचा परळी, आष्टी व केज तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान निरंक आहे. 


जिल्हाभरातील नऊ तालुक्यांत दोन लाख ५५ हजार ८०५ हेक्टरांवरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. चार लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १७४ कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी दहा हजार रुपयांची घोषणा केली असली तरी प्रशासनाच्या अहवालात हेक्टरी सहा हजार आठशे रुपयांप्रमोण (कोरडवाहू) मदतीचा अंदाज बांधला आहे. तर, फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजारांची घोषणा असतानाही १८ हजार रुपयांप्रमाणेच अंदाज बांधलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या हाती नेमकी किती रुपयांप्रमाणे मदत पडणार हे काळ ठरवणार आहे. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात कोरडवाहूसाठी ६८०० रुपये तर फळपिकांसाठी १८ हजार रुपयांप्रमाणे १७४ कोटी ५८ हजार रुपये अनुदानासाठी लागतील असा अंदाज बांधला आहे. 

साडेचार लाख शेतकऱ्यांचे नुकसान 
अहवालानुसार परळी, केज व आष्टी हे तीन तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांतील चार लाख ३२ हजार शेतकऱ्यांचे दोन लाख ५५ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान गेवराई तालुक्यात झाल्याचे नमूद असून या तालुक्यात ९१ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीची नोंद आहे. तर, सर्वात कमी नुकसान पाटोदा तालुक्यात २३९ हेक्टरांवरील झाल्याची नोंद आहे. यासह बीड तालुक्यात ३७ हजार ६३८ हेक्टर, शिरुर कासार तालुक्यात २२ हजार ९३३ हेक्टर, माजलगाव ५६ हजार ३१३ हेक्टर, धारुर २० हजार ९५१ हेक्टर, वडवणी २४ हजार ९७० हेक्टर तर अंबाजोगाई ८५६ हेक्टरांवरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीचा अंदाज आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com