इथून जाताना वाहनधारकांना धडधडतंय  

पांडुरंग उगले 
Saturday, 3 October 2020

पात्रुड-परडी-माटेगाव रस्त्याच्या अर्धवट कामाला मुहूर्त मिळेना 

माजलगाव (बीड) : मागील आठ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेले पात्रुड ते परडी माटेगाव रस्त्याचे अर्धवट काम करण्यासाठी ठेकेदाराला मुहूर्त मिळत नाही. केवळ खडीकरण (बीबीएम) करू ठेवलेला रस्ताही ठिकठिकाणी उखडला असल्याने पाच किलोमीटर जाताना वाहनधारकांसह प्रवास्यांनाही नुसतं धडधड होतंय. अनेक दुचाकी चालकांना तर मणक्याचा त्रासही होऊ लागल्याने नागरीकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
माजलगाव ते बीड हा लवूळ, परडी माटेगाव, देवडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला १५ ते २० गावे जोडलेली असून, रोज हजारो प्रवासी या रस्त्यावरून ये जा करतात. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यसाठी अंतर तसेच वेळेची बचत होत असल्याने महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्यावर मागील वीस वर्षांत कोट्यावधीचा खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लवूळ ते परडी माटेगाव या पाच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ठेकेदाराने थातूर मातूर काम करून केवळ खडीकरण (बीबीएम) करत अर्धवट काम सोडून दिले. आठ महिन्यापासून डांबराचा थर (कारपेट) न टाकल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाच किलोमीटर अंतरात वाहन चालविताना चालकासह प्रवास्यांनाही धडकी बहरतेय. रोज ये-जा करणाऱ्या दुचाकी चालकांना मणक्याच्या आजाराचा त्रास उद्भवला असल्याने नागरिकातून रोष व्यक्त होत आहे. बांधकाम विभागातही या कामाबाबत कोणताच अधिकारी समधानकारक उत्तर देत नसून लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याने नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवडणुकीपूर्वी उपोषण, नंतर दुर्लक्ष 
याच रस्त्याचे काम करण्यासाठी प्रकाश सोळंकेंनी दोन वर्षांपूर्वी थेट रस्त्यात बसून उपोषण केले होते; परंतु निवडणुकीनंतर आमदार होऊनही आता मात्र ते याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. असा आरोप लवूळच्या ग्रामस्थांनी केला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patrud-Pardi-Mategaon road is incomplete