Doctor Beaten by Police
Doctor Beaten by Police

तुज पोलिस म्हणून की...डॉक्टरलाच झोडपले अन घेऊन गेले अधिकाऱ्याच्या घरी

औसा (जि. लातूर) : कोरोनामुळे मंदिर बंद आहेत. सध्या डॉक्टरच देव आहेत, अशी भावना लोकांत असली तरी लातूर जिल्ह्यातल्या पोलिसांत मात्र ती दिसून येत नाही. दिसेल त्याला काठी मारण्याच्या प्रकारातून पोलिसांनी स्वतःच्या दवाखान्यासमोर उभारलेल्या एका डॉक्टरला चांगलेच बदडून काढले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

त्यांना पोलिस गाडीतून जबरदस्तीने घेऊन जात ठाण्याऐवजी पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी नेऊन अपमानित केले. या घटनेत डॉक्टर जखमी झाले असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. घटनेमुळे येथील पोलिसांची दंडेलशाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून येथील डॉक्टर असोसिएशनने शनिवारी (ता. दोन) ही घटना गांभीर्याने घेत तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

यात पोलिसांवर कारवाईची मागणी डॉक्टरांनी केली आहे. येथील डॉ. अमर रूद्राप्पा धाराशिवे हे गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी येथील स्वतःच्या हॉस्पिटलसमोर उभारले होते. या वेळी पोलिस तिथे आले व चौकशी न करता त्यांना मारहाण करू शकले. डॉ. धाराशिवे यांनी ते डॉक्टर असल्याचे तसेच त्यांचे वडील डॉ. रुद्राप्पा धारशिवे (वय ७३) यांनी विनवणी करूनही पोलिस ऐकले नाहीत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्यांनी मारहाण करतच व अर्वाच्य भाषा वापरत त्यांना गाडीत बसवले व ठाण्यात नेण्याऐवजी पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या निवासस्थानी नेले. सुरवातीपासून डॉ. अमर धाराशिवे हे पोलिसांनी त्यांचा गुन्हा काय आहे, हे विचारत होते. तसे पोलिस त्यांना मारहाण करत होते. हा प्रकार ठाकूर यांच्या घरीही कायम राहिला. त्यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत अर्वाच्य भाषा वापरत आणि दमदाटी करत डॉक्टरांना अपमानित केले.

तेथून पोलिस ठाण्यात नेले व थोड्या वेळानंतर सोडून दिले. या घटनेमुळे डॉ. धाराशिवे यांना मानसिक धक्का बसला व मारहाणीत ते जखमीही झाले. त्यांच्या हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शनिवारी डॉक्टर असोसिएशनने घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी निवेदन देत पोलिस निरीक्षक ठाकूर व पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचा डॉ. धाराशिवे यांच्या कुटुंबावर विपरित परिणाम झाल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.  

गैरसमजतीतून घडलेली घटना

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ही घटना गैरसमजतीतून घडल्याचे दिसत आहे. मी डॉक्टरांचेही म्हणणे ऐकून घेतले आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाईही केली जाईल. सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. नवले यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com