उमरग्यात दुकानातील रक्कम पळविणाऱ्या चोरट्यांना 'फिल्मी स्टॉईल'ने पकडले

स्मशानभूमित सुरू होता थरार, चोरट्यांकडून पोलिसांनी ४६ हजारांची रक्कम हस्तगत केली.
Umarga Crime News
Umarga Crime Newsesakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरातील बसस्थानक व महावितरण कार्यालयाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाचा पत्रा उचकाटुन दोघांनी बुधवारी (ता. २६) रात्री पळविलेली ४६ हजारांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान या चोरीच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन मध्यरात्री सव्वा दोन वाजता शहरातील हुतात्मा स्मारकाजवळील स्मशानभूमीत पोलिसांनी 'फिल्मी स्टॉईल' ने दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. या बाबतची माहिती अशी की, शहरातील महावितरण कार्यालयाच्या शेजारी महादेव संभाजी उबाळे यांचे वाहनांच्या स्पेअर पार्ट साहित्याचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद ते घरी गेले. रात्री सव्वा दहाच्या सुमारास दुकानचा पत्रा उचकटलेला दिसल्याने शेजारील हॉटेल मालकाने उबाळे यांना माहिती सांगितली. दुकान उघडुन पाहिले असता क्वांटरमधील ४६ हजार रुपये दिसून आलली नाही. (Police Catch Thieves In Umarga In Osmanabad District)

Umarga Crime News
स्वप्नातही वाटल नव्हतं की मंत्री व्हावे लागेल, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

दरम्यान याच दुकानातील कामगार भरत दत्ता ईगवे यांच्यावर चोरीचा संशय असल्याची माहिती श्री. उबाळे यांनी पोलिसांना दिल्याने रात्रीची गस्त करणारे पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी त्या दोन चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी नियोजन आखले. बाबासाहेब कांबळे, अक्षय गांजले, हारूण सय्यद, श्री. खतीब, अतुल जाधव या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन श्री. दांडे संशयित आरोपी भरत दत्ता इगवे याच्या औराद गावी पोहोचले, तेथे घरी तो नव्हता. पुन्हा रात्री शोधाशोध सुरू असताना उमरग्यातील (Umarga) स्मशानभूमीजवळ स्कुटी आरोपी वापरत असलेली काळी स्कुटी दिसून आली. मोबाईलच्या स्टॉर्चने स्मशानभूमी परिसरात शोध घेत असताना पोलिसांना पाहुन भरत पळाला.

Umarga Crime News
जालन्यात थरार ! व्यावसायिकाला मारहाण करुन वाहन कालव्यात लोटून दिले

त्याच क्षणी दांडे व कर्मचाऱ्यांनी बाजुच्या मदनानंद कॉलनी ते बाजूच्या शेतापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी मारूती गोविंद गरड यालाही पोलिसांनी चलाखीने ताब्यात घेतले. चोरलेली ४६ हजारांची रक्कम हस्तगत केली. महादेव उबाळे (रा. कवठा) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुरूवारी (ता. २७) न्यायालय समोर हजार केले असता दोघा आरोपींना (Osmanabad) शनिवारपर्यंत (ता.२९) पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक समाधान कवडे तपास करीत आहेत.

गॅरेज सुरू करण्यासाठी केली चोरी !

भरत हा उबाळे यांच्या दुकानातील कामगार आहे. त्याला गॅरेज सुरू करायचे होते. त्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी भरतने चोरी केल्याची माहिती दिल्याची दांडे यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com